वरील ओळ वाचून सामान्य लोकांना सिनेमातलं गाणं आठवतं आणि पक्षी निरीक्षकांना मात्र एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आलेले पक्षी आठवतात. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार काही पक्षी ठराविक महिन्यात, ठराविक ठिकाणी स्थलांतर करतात. मी पक्षी निरिक्षणाला सुरुवात केल्यानतंर, रत्नागिरीत कोणकोणते पक्षी स्थलांतर करून येतात हे कळायला लागलं. मग हे पक्षी दरवर्षी न चुकता का आणि कसे स्थलांतर करत असतील, याचा विचार सुरू झाला आणि माहिती मिळवत गेले. साहजिकच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. ते प्रश्न अन् उत्तरे…
नेत्रा पालकर-आपटे
पक्षी स्थलांतर म्हणजे नेमके काय ?
प्रख्यात पक्षीतज्ज्ञ लॅड्सबरो थॉमसन यांनी ‘वर्षभर अनुकूल हवामान लाभावे यासाठी पक्षी आपल्या वसतीस्थानात, दरवर्षी ठराविक काळासाठी जो तात्पुरता बदल करतात, त्याला पक्षी-स्थलांतर म्हणतात ‘ अशी पक्षी-स्थलांतराची व्याख्या केली आहे. या व्याख्येत ‘तात्पुरता बदल’ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. यात पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, व काही काळानतंर परत पूर्वस्थानी परततात हा अर्थ अभिप्रेत आहे. स्थलांतराची ही प्रक्रिया इतरही सजीवांमध्ये आढळते मात्र पक्ष्यांमध्ये ती सर्वोच्च सुधारित व अचूक असते.
पक्ष्यांना सर्वप्रथम स्थलांतराची गरज का भासली असेल ?
काही हजार वर्षांपूर्वीच्या हिमयुगात (Ice age) दडलेले आहे. हिमयुगाच्या शवेटापर्यंत म्हणजे साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी सर्वच युरोप बर्फाच्छादित होता. त्यावेळी सर्वच पक्षी दक्षिण भागात, तसेच अफ्रिकेत एकवटले असावेत. पण जसजसा बर्फ कमी होत गेला, त्या भागापासनू सर्वात जवळ असलेल्या पक्ष्यांना वसतीसाठी अनुकूल अशी नवीन जागा मिळत गेली. परंतु त्या जागेत फक्त उन्हाळ्यात ते जगू शकत. त्यामुळे पक्ष्यांची मूळ जागेतून उन्हाळ्यात या नवीन जागेकडे व हिवाळ्यात परत मूळ जागेकडे अशी ये-जा सुरू झाली. पुढील 5000 वर्षांत जसा बर्फ कमी होत गेला, तसे या स्थलांतरात काटले जाणारे अतंर वाढत गेले. कारण पक्ष्यांना जास्तीत जास्त अनुकूल जागा मिळत गेली.
भारत हा उष्णकटिबंधीय देश असल्याने येथील हिवाळा सौम्य असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धातील अनेक पक्षी तेथील तीव्र हिवाळा टाळण्यासाठी भारतात स्थलांतर करतात. तसेच भारतातील भौगोलिक विषमतेमुळे अंतर्गत स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाणही मोठे आहे.
पक्ष्यांना स्थलांतराची प्रेरणा कशी होते ?
नियमित स्थलांतर करणारे पक्षी कित्येक वर्षे पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी व साधारण एकाच दिवशी आढळून आले आहेत. (काहीवेळा हवामानातील बदलामुळे वेळ पुढे, मागे होऊ शकते) यावरून स्थलांतराची अंतःप्रेरणा किती अचकू असते ते दिसून येते. यामागची मूळ प्रेरणा ही जरी ‘अन्न’ असली, तरी आता पि ढ्यानपिढ्यांच्या पुनरावृत्तीमुळे स्थलांतर ही पक्ष्यांच्या आयुष्यातील एक नियमित घटना बनली आहे. साधारणपणे हिवाळ्याच्या सुरूवातीला पक्ष्यांना स्थलांतराचे वेध लागतात. याच काळात ते आपल्या शरीरात चरबी साठवू लागतात. त्यांच्या शरीरात काही अंर्तगत बदल होऊ लागतात. शरीरात अनेक प्रकारची प्रेरके (hormones) तयार व्हायला लागतात. असे घडून आल्यावर हे पक्षी आपल्या दुरवरच्या प्रवासाला सज्ज होतात.
पक्षी स्थलांतर कसे करतात ?
पक्ष्यांच्या पायाला वाळे (ring) लावण्याच्या पद्धतीमुळे पक्ष्यांची स्थलांतराची प्रचंड क्षमता संशोधकांना कळली. आर्क्टिक सुरय (Arctic Tern) नावाचा पक्षी दरवर्षी 12,000 किलोमीटर चा प्रवास करतो. पाकोळ्या (Swallows) युरोप-अफ्रिका-युरोप या प्रवासात 6000 मैलांचे अंतर काटतात. हे प्रचडं आकडे वाचनू एक मुलभतू प्रश्न पडतो, की इतकी मोठी अंतरे अचकूपणे दरवर्षी काटणं त्यांना कसं जमतं ? यावर शास्त्रज्ञांनी विविध प्रयोग केले आणि काही अंदाज बांधले गेले. ते असे-
1) दिवसा पक्षी सुर्यकिरणांच्या सहाय्याने दिशा ओळखतात.
2) रात्री एखाद्या तारकासमूहाचा संदर्भ बिंदू (reference point) सारखा वापर करत असावेत.
3) काही शास्त्रज्ञांनी असा अंदाज बांधला की पक्ष्यांना एखाद्या होकायंत्रा प्रमाणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची (magnetic field) जाणीव असावी.
4) पक्षी आपल्या मुळ दिशेला समांतर उडतात.
5) प्रकाशाशी ठराविक कोन राखनू पक्षी उडतात.
आधुनिक शास्त्र इतके प्रगत असून ही ‘पक्षी स्थलांतर कसे करू शकतात?’ या प्रश्नाचे ठाम उत्तर देऊ शकले नाहीये.
पक्ष्यांच्या स्थलांतराची कारणे कोणती आहेत ?
पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्राथमिक कारण हे ‘थंडी’ समजले जाते. मात्र थंड प्रदेशातील (उत्तर गोलार्धातील) पक्ष्यांच्या अंगावर थंडीपासून सरंक्षण करण्यासाठी भरपूर पिसांचे आवरण असते. त्यामुळे हे पक्षी तेथील थंडीचा फारसा त्रास वाटून न घेता हिवाळा पार पाडू शकतात. मात्र हिवाळ्यात दिवसांची लांबी कमी होत जाते. कीटक, मासे कमी होतात. त्यामुळे अन्न शोधण्यासाठी कमी वेळ आणि अन्नाची उपलब्धताही कमी. म्हणनू अन्न दुर्भिक्ष्य हेच स्थलांतराचे खरेकारण समजले जाते. मात्र याच वेळी दक्षिण गोलार्धात सौम्य हवामान, अन्नाची भरपुर उपलब्धता अशी अनुकूलता असल्याने, पक्षी स्थलांतर करतात.
काही जातीच्या पक्ष्यांमध्ये वेगळीच वर्तणूक दिसून येते. एखाद्या भागातून, एखाद्या जातीचे काही पक्षी स्थलांतर करून जातात, तर त्याच जातीतले काही पक्षी मात्र तिथेच राहतात. याला ‘Partial Migration’ असं म्हटले जाते. जे पक्षी अन्न शोधण्यास अधिक लायक असतात, ते त्याच ठिकाणी राहतात. उदा. पूर्णवाढ झालेले नर पक्षी. तर माद्या आणि लहान पक्षी अन्नासाठी स्थलांतर करतात. असे partial migration प्रमुख्याने धोबी (Wagtails), कस्तरू (Thrush), काही प्रकारची बदके (eg. Northern Shovelers, Pintails etc. ) इत्यादी प्रकारच्या पक्ष्यांमध्ये दिसून येते.
स्थलांतराचे प्रकार कोणते आहेत ?
आंतरखंडीय स्थलांतर, स्थानिक स्थलांतर, तात्कलिक स्थलांतर असे प्रकार आहेत.
1) आंतरखंडीय स्थलांतर –
या प्रकारच्या स्थलांतरात पक्षी एका खंडात पुनरुत्पादन करतात, आणि हिवाळा दुसऱ्या खंडात व्यतीत करतात. उत्तरगोलार्धातील युरोप, रशिया, ग्रीनलँड यासारख्या भागात विणीचा हंगाम घालवून, हिवाळ्यात अनेक पक्षी दक्षिण गोलार्धातील अफ्रिका, आशिया खंडांचा आसरा घेतात. आर्क्टिक सुरय (Arctic Tern), पाकोळ्या (Swallow), श्वेतबलाक (White Stork), शेकाट्या (Black winged Stilt), चक्रवाक (Ruddy Shelduck), रोहित पक्षी (Flamingo) हेआणि इतरही अनेक पक्षी स्थलांतर करून भारतात येतात.
2) स्थानिक स्थलांतर –
काही पक्ष्यांचे स्थलांतर हे एखाद्या खंडातल्या खंडात, किंवा देशांतर्गतर्ग किंवा त्याहूनही मर्यादित भागात होत असते. त्याला स्थानिक स्थलांतर म्हणतात. स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher), नवरंग (Indian Pitta), तिबोटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher) यासारख्या पक्ष्यांचे ठराविक हंगामात, ठराविक ठिकाणी प्रकट होणे लगेच लक्षात येते. बहिरी ससाणा (Peregrine Falcon), सुतंगु गरुड (Booted Eagle), अमुर ससाणा (Amur Falcon) यासारखे शिकारी पक्षीही ‘स्थानिक स्थलांतरित’ या प्रकारात मोडतात.
हिमालयात राहणारे पक्षी, हिवाळ्यातील अत्यंत प्रतिकूल हवामानात कमी उंचीवर, सखल दरीत उतरतात व उन्हाळ्यात परत पूर्वीच्या उंचीवर जातात.
3) तात्कालिक स्थलांतर –
आंतरखंडीय व स्थानिक स्थलांतराहून खूप वेगळा असा हा प्रकार आहे. या प्रकारचे स्थलांतर दरवर्षी घडून येईलच असे नाही. एखाद्या भागात पुर आला, खपू मोठा दुष्काळ पडला, तेथील पक्ष्यांना अन्न दुर्भिक्ष्य जाणवू लागले, तर काही काळासाठी पक्षी तो प्रदेश सोडून दुसरीकडे जातात. अनुकूल परिस्थिती नि र्माण झाली, की ते मळू प्रदेशात परततात. एखाद्या प्रकारच्या झाडांचा बहराचा काळ, फळे पिकण्याचा काळ, कीटकांच्या सख्ंयेतील चढउतार हे घटकही तात्कालिक स्थलांतरास कारणीभतू ठरतात.
याच प्रकारच्या स्थलांतराचा अजून एक प्रकार बदकांमध्ये दिसून येतो. याचा संबंध हा पिसांच्या गळतीशी (Moulting) असतो. बदकांची उड्डाण पिसे ( Flight feathers) एकदम गळून पडतात. अशावेळी ही बदके उडण्यास असमर्थ असतात. सुरक्षितेसाठी अशा काळात अनेक बदके एकत्र येऊन, एका विशिष्ट ठि काणी जाऊन पिसांची गळती घडवून आणतात. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, तेंव्हा आपापल्या मूळ ठिकाणी ही बदके परततात.
पक्ष्यांचे स्थलांतर हा एक खपू मोठा संशोधनाचा विषय आहे. यावर अनेक शास्त्रज्ञ संशोधन करतच आहेत. तरीही अजूनही अनेक रहस्यांची उकल झालेली नाही. आशा करूया की येत्या काही वर्षांत आपण पक्ष्यांच्या या आभाळातल्या ठश्यांची कारणमीमांसा शोधून काढू…!
नेत्रा पालकर-आपटे
रत्नागिरी.
रत्नागिरीत वर्षभरात साधारण पावणे तीनशे प्रकारचे पक्षी दिसून येतात. यामध्ये स्थानिक आणि स्थलांतरित अशा दोन्हीही पक्ष्यांचा समावेश आहे. यातील काही स्थलांतरित पक्ष्यांची छायाचित्रे अशी…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.