December 4, 2024
lights Camera Goa! Iffy 2024
Home » लाइट्स, कॅमेरा, गोवा ! इफ्फी 2024 
मनोरंजन

लाइट्स, कॅमेरा, गोवा ! इफ्फी 2024 

इफ्फीविषयी

इफ्फी हा जगातील 14 सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा चित्रपट महोत्सवांपैकी’ एक असून त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता संघ (FIAPF) द्वारे मान्यता प्राप्त आहे. जागतिक स्तरावर चित्रपट महोत्सवांचे संचालन करणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कान, बर्लिन आणि व्हेनिस सारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे या श्रेणी अंतर्गत FIAPF द्वारे मान्यताप्राप्त इतर प्रतिष्ठित महोत्सव आहेत.

नवी दिल्ली – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारणमंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) माध्यमातून गोवा राज्यसरकारसोबत त्यांच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) या संस्थेच्यामाध्यमातून संयुक्तपणे गोवायेथे 20ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी)आयोजित केला आहे. चित्रपटकर्मी आणि रसिकांना 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) नक्कीच आनंदाची पर्वणी ठरणार असून उत्कृष्टनियोजन आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम यासह अविस्मरणीय चित्रपटसोहळ्याची ग्वाही हा महोत्सव देतो.

55व्या इफ्फी अर्थात आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पहिली वाहिली अर्थात कर्टन रेझर पत्रकार परिषद आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर,  इफ्फी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर,  केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“कानसारख्या जागतिक महोत्सवांशी तुलना करता इफ्फी हा महोत्सव आता केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला आहे”

डॉ एल मुरुगन

डॉ एल मुरुगन यांनी आपल्या भाषणात या महोत्सवाच्या जागतिक व्यासपीठावरील महत्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित केले. या महोत्सवातून मिळणारा अद्वितीय अनुभव अधिकाधिक समृद्ध व्हावा यादृष्टीने दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो असे सांगून यावर्षीच्या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या नोंदणीने अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला असून यावरून महोत्सवाची व्याप्ती आणि त्याचा वाढता प्रभाव यांची प्रचिती येते,  असे ते म्हणाले. 

या महोत्सवात नागरिक देखील अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हावेत यासाठी मंत्रालयाने मुंबई आणि चेन्नईमधील अलीकडेच केलेल्या काही कार्यक्रमांसह,  हैदराबादसह मोठ्या शहरांमध्ये प्रचारात्मक रोड शो आयोजित केले आहेत. उद्योगजगताने देखील या कार्यक्रमाला आपलाच कार्यक्रम समजून आत्मीयतेने समरस व्हावे आणि आत्मनिर्भर भारत तसेच इफ्फीला जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा प्रसिद्ध सिनेमॅटिक इव्हेंट म्हणून स्थान मिळावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला साकार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आणि गोव्यातील या महोत्सवात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.मुरुगन यांनी यावेळी केले.

इफ्फी 2024 ची संकल्पना : ‘युवा चित्रपटनिर्माते’ – भविष्य आताच आहे

सर्जनशीलतेचे भविष्य घडवण्याच्या युवा चित्रपटनिर्मात्यांच्या क्षमतेला ओळखून केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री  अश्विनी वैष्णव यांच्या दृष्टीकोनातून साकारलेली इफ्फी 2024 ची संकल्पना : ‘युवा चित्रपटनिर्माते’ – “भविष्य आताच आहे” यावर केंद्रित आहे.

भारत हा वेगाने चित्रपट निर्मिती करणाऱ्या जगातील बलाढ्य राष्ट्रांपैकी एक म्हणून गणला जात असून या क्षेत्रातील प्रत्येक अंग आणि दृष्टिकोनाचा विचार केला जात आहे. आपल्या चित्रपटउद्योगातील नवीन उदयोन्मुख प्रतिभा आपल्या देशाच्या भविष्याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज त्यांच्या उदघाटनपर भाषणात व्यक्त केला. चित्रपटनिर्माते आणि रसिक प्रेक्षक या दोन्ही घटकांचा विचार करून यावर्षीच्या इफ्फी 2024 ची रचना केली आहे, तसेच भविष्य घडवण्याची क्षमता असलेल्या आवाजांना प्राधान्य दिले असून देशाच्या सांस्कृतिक कथनाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विशेषतः उदयोन्मुख युवा चित्रपटनिर्मात्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे, असे ते म्हणाले.

75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ अर्थात उद्याचे 75 सर्जनशील कलावंत या उपक्रमाचा आवाका अधिक व्यापक करून गेल्या महोत्सवातील 75 कलावंतांच्या ऐवजी आता 100 तरुण प्रतिभावंताना संधी देण्यात येणार आहे.  देशभरातील चित्रपट विद्यालयांमधील 400 युवा चित्रपट विद्यार्थ्यांना मंत्रालयाकडून इफ्फी मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व सुविधा दिल्या जात आहे.

संपूर्ण भारतातील युवावर्गामधील चित्रपट निर्मितीचे कौशल्य ओळखण्यासाठी एक नवीन विभाग आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा भारतीय दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील सुरु करण्यात आला आहे. तरुण निर्मात्यांसाठी मास्टरक्लास, पॅनल चर्चा, फिल्म मार्केट आणि फिल्म पॅकेजेस इत्यादी उपक्रम आखण्यात आले आहेत.  याशिवाय इफ्फी 2024 मध्ये चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना आदरांजली वाहिली जाईल आणि काही विशेष विभाग आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्याविषयीचे यथार्थ दर्शन घडवले जाईल ज्यामुळे गोव्यातील प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळेल.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर या महोत्सवाचे संचालक असून हा महोत्सव म्हणजे उद्योगाने उद्योगजगतासाठी चालवलेला महोत्सव म्हणून उदयाला आला आहे आणि हेच 55 व्या  इफ्फी महोत्सवाच्या एकत्रित आयोजनाचे सार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितले. चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात आपण प्रथमच या संपूर्ण उपक्रमाची धुरा उद्योगजगताकडे सोपवण्याची परंपरा सुरु केली असून ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव : कथाकथन म्हणजेच गोष्ट सांगणे या  कथात्मक मांडणी  कलेचा सोहळा

सिनेमाच्या माध्यमातून गोष्ट सांगणे म्हणजेच  कथात्मक मांडणी ही  अत्यंत महत्वाची भूमिका बजावते असं ठाम मत महोत्सवाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले. कथात्मक मांडणी म्हणजे सिनेमाचा आत्माच असल्याचे ते म्हणाले.  तो सिनेअनुभवाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले.

सध्याचे जग झपाट्याने बदलत आहे, अशावेळी कथाकथन अर्थात गोष्ट सांगण्याच्या कलेची जपणूक करणे कधी नव्हे इतके गरजेचे झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत, त्यांनी कथात्मक मांडणीमुळेच सिनेमा प्रभावी होतो ही बाब अधोरेखीत केली. त्यांच्या या मतांमधून या कालातीत कलेचा सन्मान आणि संवर्धन करण्याप्रती या महोत्सवाची बांधिलकीचेच दर्शन घडून येते.

भारत : अविरत स्वप्नांचा देश

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (Central Board of Film Certification – CBFC) अध्यक्ष प्रसून जोशी यांनी भारत हा ‘चिरंतन स्वप्नांचा देश’ असल्याचे मत व्यक्त केले. तळागाळातील कथात्मक मांडणी करणाऱ्यांच्या अस्सल भावना सामायिक करता येण्याच्याददृष्टीने या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. अशा प्रतिभांना उभारी देण्यात तसेच जागतिक पटलावर ओळख मिळवून देण्यात इफ्फीची भूमिका महत्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखीत करत, २०२४ या वर्षाच्या आंतराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची संकल्पनाही उपस्थितांसमोर पुन्हा एकदा मांडली. क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरोच्या माध्यमातून या उदयोन्मुख प्रतिभांना सहकार्य आणि पाठबळ देण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली. जी गोष्ट अजूनही सांगायची राहून गेली आहे, ती जगासोबत सामायिक केली पाहीजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

इफ्फी2024 ची ठळक वैशिष्ठे

  1. जागतिक सहभाग आणि चित्रपटांची संख्या :
    या वर्षी इफ्फीसाठी 101 देशांमधून 1,676 अर्ज प्राप्त झाले असून ते या महोत्सवाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचे द्योतक आहेत. इफ्फी 2024 मध्ये 15 जागतिक प्रीमियर, 3 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 40 आशियाई प्रीमियर आणि 106 भारतीय प्रीमियर्ससह 81 देशांमधील 180 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जातील. यामध्ये नामवंत आणि जगात इतरत्र पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचा समावेश असून यंदाचा महोत्सव प्रेक्षकांवर आपला अमीट ठसा उमटवणार, हे नक्की !
  2. कंट्री ऑफ फोकस म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड : 
    इफ्फी 2024 साठी कंट्री ऑफ फोकस म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे समर्पित पॅकेज महोत्सवात असून ऑस्ट्रेलियाच्या चित्रपटाचा ठळक प्रभाव यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळेल. इतर ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्क्रीन ऑस्ट्रेलिया आणि NFDC यांच्यातील सामंजस्य करार असून याअंतर्गत इफ्फी महोत्सव आणि फिल्म बझारमध्ये आघाडीच्या ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्यांचा सहभाग असेल. ऑस्ट्रेलियातील उत्तमोत्तम चित्रीकरण स्थाने आणि सहनिर्मितीला चालना देणारे प्रदर्शनही Aus Film या संस्थेद्वारे होणार आहे.
  1. मायकेल ग्रेसी यांच्या’बेटर मॅन’या चित्रपटाने होणार   महोत्सवाचा प्रारंभ (ओपनिंग फिल्म  ) :
     महोत्सवाचा प्रारंभ,मायकेल ग्रेसीच्या ‘बेटर मॅन’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाच्या आशिया प्रीमियरसह होणार आहे. प्रसिद्ध ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सच्या जीवनाची चित्तवेधक झलक हा चित्रपट दर्शवतो. यात विल्यम्सला चिंपांझी म्हणून चित्रित करण्यात आले असून ही भूमिका जोनो डेव्हिसने साकारली आहे. मोशन कॅप्चर कलाविष्काराचे चांगले उदाहरण हा चित्रपट म्हणता येईल.
  2. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
    इफ्फी 2024 मध्ये प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक ‘फिलिप नॉयस’ यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वैशिष्टयपूर्ण कथनशैली आणि रहस्यमय, प्रभाव निर्माण करणारे चित्रपट यासाठी ते ओळखले जातात. नॉयस यांच्या चित्रपटांमध्ये पॅट्रियट गेम्स, क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर, सॉल्ट, द सेंट, द बोन कलेक्टर आणि इतर अनेक प्रतिष्ठित चित्रपटांचा समावेश आहे. हॅरिसन फोर्ड, निकोल किडमन, अँजेलिना जोली, डेन्झेल वॉशिंग्टन आणि मायकेल केन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून चित्रपटकलेतील त्यांचे प्रभुत्व उल्लेखनीय आहे.
  3. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग –
    यात 15 फिचर फिल्म्स (12 आंतरराष्ट्रीय + 3 भारतीय) आहेत. 40 लाख रुपये रोख, गोल्डन पीकॉक असे स्वरूप असलेल्या प्रतिष्ठेच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी या चित्रपटांमध्ये स्पर्धा होईल. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष ज्युरी पुरस्कार या श्रेणीतील विजेत्यांची निवडदेखील ज्युरी करतील.
  4. Best Feature Film Debut Director पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन –
    या विभागात प्रतिष्ठित सिल्व्हर पीकॉकसाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय चित्रपट स्पर्धेत असतील. 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  5. आंतरराष्ट्रीय ज्युरी – 
    प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आणि अभिनेता आशुतोष गोवारीकर (अध्यक्ष),  सिंगापूरचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अँथनी चेन, यूकेच्या प्रतिष्ठित निर्मात्या एलिझाबेथ कार्लसन, प्रसिद्ध निर्माते फ्रॅन बोर्जिया आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट संकलक जिल बिलकॉक यांचा समावेश आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळात आहे.
  6. इंडियन पॅनोरमा
    भारताची सिनेमॅटिक विविधता : या विभागात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे 25 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि 20 नॉन-फीचर चित्रपट दर्शविले जातील. या विभागात उदघाटनाचा चित्रपट रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर (हिंदी) दाखवला जाईल तर उदघाटनाचा कथाबाह्यपट घर जैसा कुछ (लडाखी) हा आहे.
  7. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक – 
    इफ्फीच्या ‘युवा चित्रपटकर्ते’ यावर केंद्रित संकल्पनेनुरूप , देशभरातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेची दखल घेण्यासाठी एक नवा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. एकूण 102 चित्रपटांमधून निवडलेले 5 चित्रपट या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहेत. प्रमाणपत्र व 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून समारोप समारंभात तो प्रदान करण्यात येईल.
  8. सर्वोत्कृष्ट वेब मालिका (OTT) पुरस्कार: 
    सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) या पुरस्कारासाठी  गतवर्षीच्या 32 प्रवेशिकांच्या तुलनेत यावर्षी 46 प्रवेशिका आल्या आहेत.विजेत्या मालिकेला प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.या पुरस्काराची घोषणा समारोप समारंभाच्या वेळी केली जाईल.
  9. शताब्दी वर्ष
    IFFI-2024 वेळी भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गज राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांना उद्घाटनप्रसंगी आणि समारोपाच्या वेळी  विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे श्रध्दांजली अर्पण केली जाईल, तसेच IFFiesta मध्ये विविध विषयांवर उत्तम प्रदर्शने आयोजित केली असून या कार्यक्रमाचे संस्मरण म्हणून भारतीय टपाल खात्याद्वारे विशेष तिकिटांचे प्रकाशन करण्यात येईल.
    शासनाच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) अंतर्गत NFDC-NFAI द्वारे पुनर्संचयित केलेला या प्रत्येक दिग्गज कलाकारांचा प्रत्येकी एक उत्कृष्ट चित्रपट देखील IFFI मध्ये प्रदर्शित केला जाईल.IFFI मध्ये दाखवले जाणारे पुनर्संचयित अभिजात चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत –
     आवारा (1951) – राज कपूर
    देवदासू (1953)- अक्किनेनी नागेश्वर राव
    हम दोनो (1961) – मोहम्मद रफी
    हार्मोनियम (1975) – तपन सिन्हा
  10. नवनिर्मित विभाग आणि आंतरराष्ट्रीय प्रोग्रॅमिंग: 
    इफ्फी 2024 मध्ये चार नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंग विभाग सादर करण्यात आले आहेत: उदयोन्मुख तारे (उदयोन्मुख दिग्दर्शकांचा उत्सव), मिशन लाइफ (पर्यावरणाविषयी जागरूक चित्रपटावर प्रकाश), ऑस्ट्रेलिया: कंट्री ऑफ फोकस आणि दोन देशांमध्ये चित्रपट क्षेत्रात खोलवर सहकार्यास पाठबळ देणारे करार पॅकेज, ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटकडून निवडलेल्या कलाकृतींचा समावेश. या विभागांमुळे इफ्फीच्या वैविध्यपूर्ण समृद्धतेची कल्पना तर येतेच शिवाय प्रेक्षकांना आशयघन, नाविन्यपूर्ण आणि कलात्मक उत्क्रांतीचा अनुभव घेता येतो.
  11. महिला आणि तरुण उदयोन्मुख प्रतिभेला  प्राधान्य देणारे चित्रपट: 
    IFFI 2024 मध्ये नेहमीप्रमाणे वंचितांच्या प्रश्नांना उजेडात आणणारे आणि  प्राधान्य देणारे, तसेच महिलांनी दिग्दर्शित केलेले 47 चित्रपट आणि तरुण आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांचे 66 चित्रपट यांचाही  समावेश आहे, ज्यातून अशा दबलेल्या आवाजांकडे  विशेष लक्ष देण्याची महोत्सवाची वचनबद्धता दर्शविली जाते.’द विमेन इन सिनेमा’ या महिला विभागात उदयोन्मुख प्रतिभावान  महिला चित्रपट निर्मात्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर हे चित्रपट प्रकाश टाकतील.
  12. प्रदर्शनासाठी 6 अतिरिक्त चित्रपटगृह सज्ज:
    मडगाव येथील आयनाॅक्सची 4 आणि पोंडा येथील आयनाॅक्सची 2 चित्रपटगृहे या वर्षी महोत्सवातील चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात आली आहेत. महोत्सवादरम्यान आयनाॅक्स पणजी (4),मॅक्विनेझ पॅलेस (1), आयनाॅक्स पोर्वोरीम (4), आयनाॅक्स मडगाव (4), आयनाॅक्स पोंडा (2) आणि झेड स्क्वेअर  सम्राट अशोक (2) अशा विविध 5 ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील.याशिवाय गोव्यात 5 तंबू, तंबूतील चित्रपट (पिक्चर टाईम फ्लॅटेबल थिएटर्स) या चित्रपट प्रदर्शनासाठी तयार ठेवण्यात आली आहेत.
  13. “क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो”या उपक्रमाचा  विस्तार:
    क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) या  उपक्रमाने यावर्षी 1,032 प्रवेशिकांसह अभूतपूर्व विक्रमी सहभाग नोंदवला आहे, जो 2023 पेक्षा  जवळपास दुप्पट आहे. हा उपक्रम 13 चित्रपटकलांमधील निर्मिती प्रक्रियेतील तरुण प्रतिभेला चालना देतो आणि यासाठी प्रथमच, 100 एकूण सहभागी निवडले जातील, जे इच्छुक चित्रपट निर्मात्यांना एक अनोखे व्यासपीठ मिळवून देतील.
  14. मास्टरक्लास, चर्चासत्रे आणि चित्रपट उद्योगाशी संपर्क :
    ए.आर. रहमान, शबाना आझमी, मणिरत्नम, विधू विनोद चोप्रा या दिग्गजांसोबत  फिलिप नॉयस आणि जॉन सील यांसारख्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या नेतृत्वाखाली कला अकादमीमध्ये 25हून अधिक मास्टरक्लास आणि चर्चासत्रे याचा आस्वाद घेण्याची  चित्रपट रसिकाना  संधी  आहे.यामुळे उपस्थितांना ध्वनी संयोजन , डिजिटल युगातील अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळेल. 
  15. फिल्म बाजार 2024: 
    दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपटांचा बाजार: यंदाची फिल्म बाजारची 18 वी आवृत्ती ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती असेल, ज्यात 350हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विविध विभागांतून प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत. ‘मार्च डु कान्स’चे माजी विपणन प्रमुख श्री जेरोम पिलार्ड यांनी फिल्म बाजारचे सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.नॉलेज सिरीजमध्ये लेखन मार्गदर्शन आणि चित्रपट निर्मिती, वितरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याविषयी कार्यशाळा यांचा समावेश असेल.इफ्फीच्या बाजूला जो फिल्म बाजार आयोजित केला जातो,तेथे नेहमीच  कल्पना साकार होतात, कथांना ध्वनी मिळतो आणि स्वप्ने आकार घेतात.  इथेच सिनेमाचं भविष्य त्याच्या वर्तमानाला भेटते.2007 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात आवश्यक चित्रपट बाजार बनला आहे.या वर्षीचे मंडप आणि प्रदर्शने वॉटर फ्रंट प्रोमेनेडच्या बाजूने आयोजित केले जातील आणि त्यात विविध देश आणि राज्ये, चित्रपट उद्योग, तंत्रज्ञान आणि VFX उद्योग इत्यादींचा प्रचंड सहभाग राहील.पॅव्हेलियनमध्ये उद्योगांचा अधिक चांगला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी FICCI सोबत भागीदारीद्वारे अनेक मंच उभारले जात आहेत. या वर्षीच्या फिल्म बझारमध्ये खुले ‘खरेदीदार-विक्रेते’ संमेलन देखील आयोजित करण्यात येईल, जिथे चित्रपट निर्मात्यांना सहकार्य मिळेल.
  16. ‘IFFIesta’ – Interactive Experiences and Cultural Festivities: 
    This year, IFFI will host the 1st IFFIesta, an entertainment extravaganza set to bring communities together through the magic of film, music, dance, food, art, and interactive experiences. It will offer curated dining and musical showcases for festival-goers, enhancing the cultural vibrancy of the festival. Entertainment Arena in and around Kala Academy will be focused for youth. Performances are also being organized through partnerships from Zomato. A Carnival Parade around the ‘Journey of Indian Cinema’ would be organized as part of the Fiesta on 22nd Nov., 2024.
    Films, Culture, and Art to come together at IFFIESTA
  17. प्रवेशयोग्यता आणि सर्वसमावेशकता
    IFFI च्या इतिहासात प्रथमच , 55 वा IFFI सहजसुलभ प्रवेशयोग्य IFFI महोत्सव असेल.हा चित्रपट महोत्सव सर्व चित्रपट रसिकांसाठी, विशेषत: दिव्यांग लोकांसह, रसिकांसाठी  प्रवेशयोग्य आहे याची खात्री करण्यासाठी, IFFI ने स्वयं या अग्रगण्य संस्थेला प्रवेशयोग्यता भागीदार म्हणून नेमले आहे.IFFI 2024 सर्वसमावेशकतेसाठी वचनबद्ध असून त्यात, सर्व ठिकाणे सुलभपणे प्रवेश करण्यासाठी सुयोग्य बनवली गेली आहेत, तसेच स्वयंसेवकांना  दिव्यांगांबद्दल संवेदनशील करण्यात आले आहे.माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या “सबका साथ, सबका विकास” च्या भावनेला मूर्त स्वरुप देत IFFI मधील सर्व चित्रपट, कार्यक्रम आणि  उपक्रमांचे वर्णन श्राव्य पध्दतीने ऐकण्यासाठी आणि सांकेतिक भाषेतील स्पष्टिकरणांसह तसेच, ऍप्लिकेशन्सच्या वापराद्वारे यातील सुलभता सुनिश्चित करण्यात आली आहे.
  18. महोत्सव स्थानाची जाहिरात  आणि सुशोभीकरण – NFDC आणि ESG यांनी ‘एकत्रित’ सजावट आणि सर्व महोत्सव स्थळांवरील  जाहिरातींसाठी राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID), अहमदाबाद यांच्या सोबत भागीदारी केली आहे.

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजे समृद्ध अनुभवाची हमी आहे. सांस्कृतिक वारशाची नवोन्मेषासासोबत घातलेली अद्भूत सांगड चित्रपट निर्मितीचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

प्रतिनिधी नोंदणी आणि इतर अधिक तपशिलांसाठी, कृपया IFFI च्या अधिकृत संकेतस्थळाला https://iffigoa.org/ ला भेट द्या


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading