🌹🌹 कूथला 🌹🌹
पुन्हा एकदा कुणीतरी शहाणा बरडला
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला
उघडे पाडावे आधी व्यवस्थेतील दंभ ,
दिसेल तेव्हा सारा बिनपाण्याचा बंब .
फुसक्या वाऱ्यासंग तोंड कन मुरडला ,
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला .
कुसर दिसे जनाचा आपला मुसर दिसत नाही ,
चुगल्यामधी रमून गेली कलाकारी बाई .
जाण नाही जरी कोण कसा भरडला ,
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला .
खिचडीतल्या अळ्या मोजून पाय कधी ,
ऑनलाईनची दांडी फिरत नाही साधी .
फुकटचे भत्ते घेऊन पोट याचा मुरडला ,
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला .
योजनेची माती कोण खाते भाऊ ,
चोर मिळून इतरांना जगू नका देऊ .
लोकाच्या जीवावर बोक्या सुरडला ,
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला .
बंगला तुले फुकटचा घेते पेंशन वरून ,
घर बांध शिक्षकाले गाव पहा फिरून .
बोलण्यात दिसून आले किती पुरडला ,
भर सभेत उभा कुथू कुथू ओरडला .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.