बीजोत्पादन पिकातील कापणी आणि मळणी
- कांद्याच्या गोंड्यात एकाच वेळी सर्व बी पक्व होत नाही. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो व बियांचे आवरण (कॅप्सूल)फाटून त्यात काळपट बी दिसू लागते.
- गोंड्यात असे ५ ते १० टक्के कॅप्सूल फाटून बी दिसायला लागले तर समजावे बी परिपक्व झालेले आहे. गोंडे जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. सामान्यतः ३ ते ५ वेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते.
- सकाळच्या वेळी काढणी करावी, जेणेकरून वातावरणातील आद्रता व गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडत नाही.
- गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना ते ३ ते ४ वेळा वरखाली करावेत.
- गोंडे जर चांगले सुकले नाही तर बी मळणी अवघड होते व बियांवर सालपट चिटकून राहिल्याने त्याची भौतिक शुद्धता कमी होते.
- चांगले सुकलेल्या गोंड्यामधून बी हळू हळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे .
- हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साहाय्याने अथवा प्रतवारी यंत्राच्या सहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.
- अधिक माहितीसाठी संपर्क –
डॉ. राजीव काळे, डॉ. एस एस गडगे, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.