मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप मुंबई येथे साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध मराठी लेखक रंगनाथ पठारे, प्रदीप गोपाल देशपांडे, प्राची गुर्जरपाध्ये, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, ज्येष्ठ कवयित्री नीरजा उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिप पुरस्कारांची घोषणा केली होती.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिध्द लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, कथा संग्रह आणि समिक्षात्मक अशी एकूण १५ पुस्तके प्रकाशित आहेत. नेमाडे यांनी लंडन स्थित “स्कुल ऑफ ओरियंटल अँड आफ्रीकनस्टडीज’ सह विविध विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मराठी आणि तौलानिक साहित्याविषयी अध्यापनकार्य केले आहे. महाराष्ट्रातील लघु साहित्यिक योगदानासाठी त्यांना केंद्र आहेत. साहित्यिक योगदानासाठी त्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आदी मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलानिक साहित्यिक अध्यासनाचे प्रमुख म्हणून नेमाडे निवृत्त झाले. सध्या ते गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागांतर्गत सोहिरोबनाथ अंबिये अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
भालचंद्र नेमाडे ज्यांना साहित्य अकादमीने आपला सर्वोच्च सन्मान, साहित्य अकादमी फेलोशिप दिली आहे, ते मराठीतील एक प्रतिष्ठित काल्पनिक लेखक, कवी, अभ्यासक आणि समीक्षक आणि मराठी आणि इंग्रजी साहित्यावरील एक मान्यताप्राप्त अधिकार आहेत. तो इंग्रजीतही लिहितो. नेमाडे यांचा जन्म ५ मे १९३८ रोजी सांगवी ( जि. जळगाव) येथे झाला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, नेमाडे महाराष्ट्राच्या दोन पराक्रमी परंपरा – महानुभाव आणि वारकरी – या संस्कृतीत वाढले. ज्याचा त्यांच्यातील लेखक आणि कवीवर खोलवर परिणाम झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून भाषाशास्त्रात एम.ए केले आणि तीन वर्षांच्या कालावधीनंतर बॉम्बे युनिव्हर्सिटी (आता मुंबई विद्यापीठ) मधूनही इंग्रजी साहित्य हा विशेष विषय म्हणून घेतला. त्यांच्या पीएच.डी.साठी. पदवी प्राप्त करून त्यांनी ‘१९व्या शतकातील मराठी गद्याचा शैलीत्मक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. १९६४ मध्ये शिकवण्यास सुरुवात केल्यानंतर नेमाडे यांनी इंग्रजी भाषा आणि साहित्य; साहित्य प्रकार: महाकाव्य, कविता आणि कादंबरी; गद्य; भाषाशास्त्र आणि शैलीशास्त्र; अनुवाद, तुलनात्मक अभ्यास शिकवला. अहमदनगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, पणजी, मुंबई आणि लंडन सारख्या शहरातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये भारतीय साहित्य आणि मराठी भाषा आणि साहित्य. ग्रामीण भागात बालपण घालवलेले आणि नंतर एका महानगरातून दुसऱ्या महानगरात फिरत राहिले. १९६३ मध्ये त्यांच्या पहिल्या आणि युगकालीन कादंबरी कोसला या कादंबरीने आजूबाजूच्या जगाला जाणण्यासाठी खऱ्या अर्थाने ताजे जागतिक दृश्य सादर केले. कोसलाने कल्पित लेखकांसाठी असंख्य कल्पक शक्यतांचा परिचय करून दिला आणि वाचकांच्या पिढ्यांवर खोलवर प्रभाव टाकला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. नेमाडे यांनी साहित्य अकादमीशी त्यांचे असलेले ऋणानुबंध उलगडून दाखवले. त्यांनी पदभार स्वीकारण्या पूर्वीची आणि नंतरची साहित्य अकादमीची चित्रकथाच सभागृहात सादर केली. त्यांच्या पुढाकाराने आणि सहकार्यांच्या सहकार्यामुळे अकादमीत झालेले बदलही त्यांनी अगदी थेट आणि नेमक्या शब्दांत मांडले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध मराठी लेखक रंगनाथ पठारे, प्रदीप गोपाल देशपांडे, प्राची गुर्जरपाध्ये यांनी त्यांना गवसलेले प्रा. नेमाडे सभागृहासमोर सादर केले. कृष्णा किंबहुणे यांनी कार्यक्रमाचे नेमक्या शब्दांत सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.