November 21, 2024
Mid night Sun on Arctic Circle Jaiprakash Pradhan article
Home » ‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)
पर्यटन

‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)

पृथ्वीच्या उत्तर टोकाच्या म्हणजे आर्किट सर्कलच्या सफरीमध्ये मध्यरात्रीचा सूर्य आणि नॉर्दन लाईट्स याबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून…

आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान

आर्क्टिक सर्कलच्या पलिकडचा भाग म्हणजे पृथ्वीचे उत्तरेकडील अखेरचे टोक…एन ऑफ वर्ड असे म्हणायला हरकत नाही. अगदी उत्तरे कडच्या विविध देशांच्या भटकंतीत आम्ही अनेकदा ही आर्क्टिक सर्कलची रेषा ओलांडली. त्याच्या आसपासच्या भागातही भरपूर फिरलो. तो एक अत्यंक रोमहर्षक, चित्त थरारक अनुभव होता. विशेष म्हणजे उत्तरे कडील आर्क्टिक सर्कलची रेषा आम्ही निरनिराळ्या मौसमात पार केली. त्यामुळे जुन जुलै महिन्यात सूर्य क्षितीजावर चोवीस तास तळपताना पाहीला आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इथे सूर्य क्षितीजावर येतच नसल्याने २४ तासांचा अंधारही बघितला. याचवेळी आकाशात रंगांची उधळण म्हणजे नॉर्दन लाईट ही पाहण्याच्याबाबतीत आम्ही नशिबवान ठरलो. उत्तर धृवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला. युरोपचे उत्तरकडील अखेरचे टोक नार्थ केपवर जसा पाय ठेवला तसेच उत्तरेकडील नॉर्वेच्या अगदी आतपर्यंत गेलो आणि कॅनडा इथे हिवाळ्यात उणे 50 अंश सेल्सिअसपर्यत तापमान घसरते अशा युकॉन प्रांतातही मनसोक्त भटकलो…

आर्क्टिक सर्कल ओलांडल्याबद्दल सन्मानपत्र

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading