March 27, 2023
Shradha Aahe Poem by Ajay Chavan
Home » श्रद्धा आहे…
कविता

श्रद्धा आहे…

श्रद्धा आहे..…

अंधश्रद्धा नाही । श्रद्धा आहे देवा ।
जननीची सेवा । तुझी वाटे ।।

काय करू तुज । धोंड्यात पाहून ।
आसवे वाहून । त्याच्यापुढे? ।।

दुःख तर माझे । तिने केले नष्ट ।
करुनिया कष्ट । नित्यनेमे ।।

आईच्या पदरी । मायेची सावली ।
बाळास पावली । हाक देता ।।

दुःख काय आहे । त्यांना नाही ज्ञात ।
ज्यांच्या हृदयात । आहे आई ।।

दिलेच नसते । जन्म जर तिने ।
शक्य मज जिणे । नसतेच ।।

हसत राहतो । नित्य हसवतो ।
आईस जाणतो । दयासिंधु ।।

नको धनद्रव्य । तिच्या पूजेसाठी ।
आधाराची काठी । नित्य बनू ।।

अजुचे अभंग । जपे आईनाम ।
माझे नित्य काम । आईनमें ।।

कवी -अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

Related posts

सावळी

बोर्डाची परीक्षा

साथ दे तू मला

Leave a Comment