आली दिवाळी अंगणी
आकाशीचा चंद्र आज
मी बांधला माझ्या दारी
दारात ग ह्या उतरल्या
चांदण्या रंगीत भारी
जीव उजळला कसा
दिवा उजेड पाहून
सुगंध दरवळतो
मनी चंदन होऊन
आरास झेंडू फुलांचा
मंडप बांधला कोणी
साडी रेशमी नेसून
दिवाळी आली अंगणी
नितळ कायेचा साज
उटणे आणि अत्तर
लाडू, चकली, करंजी
भूक चेताळते फार
येता दीपावली सण
जाते हरकून मन
आनंद उत्साह असा
वाहतो ग ओसंडून
राजा माळगी 94 21 71 13 67
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.