October 6, 2024
Cassia fistula how to cook as vegetable
Home » Privacy Policy » बहावाची भाजी कशी करायची ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बहावाची भाजी कशी करायची ?

शास्त्रीय नाव : Cassia fistula
स्थानिक नाव : बहावा, अमलतास
उपयोगी भाग : फूल
औषधी उपयोग : त्वचाविकार बहवा उपयोगी

बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात.

महत्त्वपूर्ण उपयोग

  • कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
  • बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे.
  • शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
  • जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मिलिलिटर तूप देऊन तिसऱ्या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश)-मगज १५ ते २० ग्रॅम पाण्याबरोबर देतात. आरग्वधाचा मगज हा पदार्थ गाभुळेल्या चिंचेसारखा असतो. त्याच्या सेवनामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.

अशी करा बहावाची भाजी

बहावाची फुलं पाण्यात उकडून घायची. थंड झाला की पाणी निथरून घेणे.
चमचा तेल घेणे त्यात जीरा, मोहरी, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 हिरवी मिरची,अद्रक लसूण पेस्ट घाला.
बारीक चिरलेला टोमॅटो घाला, त्यात 1⁄2 चमचा हळद, 1 चमचा धना पूड, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, बेसन 1 1⁄2 चमचा घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
यात आता उकडलेले फुलं घाला. चावी नुसार मीठ, साखर, आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून भाजी 5 मिनिटे शिजवून घ्या.



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading