काम माझं कष्टाचं
काम माझं कष्टाचं
राहाणं माझं झोपडीचं
गाडी बंगला असणं
आम्ही स्वप्नात बघायचं
दिवस उगवायला उठायचं
पायाला भिंगरी बांधायचं
उन्हावर प्रेम करणं
दुरच्या सावलीकडं बघायचं
मिळंल तिथं खायचं
असलं तर नेसायचं
नवीन नेसायला असणं
हे तर भाग्य म्हणायचं
नातं माझं रक्ताचं
प्रेम सगळ्यावर असायचं
जीवाला जीव लावणं
पिढ्यान पिढ्या चालायचं
डॉ. माणिक बनकर ( बनफुल), कराड
मोबाईल – 9960314514
- हरियाणा फाइल्समधून मतचोरीचा पोलखोल
- बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक 64.66% मतदान
- थंडीची चाहूल लागणार !
- नीतीश कुमारांचे भविष्य भाजपच्या हाती
- प्रभा प्रकाशनाकडून ९२ वर्षांच्या वाचकास शंभर पुस्तके भेट
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.





