मी एक बाप आहे
तुला कस सांगु देवा
अंगाला येणारा माझा घाम
मी एक बाप आहे रे म्हणुन
लेकरांसाठी करतोय काम
संकट मी झेलले रे
दु:ख तुला कस सांगु
मी एक बाप आहे रे
लेकरांना कस काय मागु
बालपणी खांद्यावर घेऊन
त्यांना खेळवले
घोडागाडी होऊन
पाठीवर त्यास बसवले
कर्ज सावकाराच काढुन
शिक्षण लेकरांना शिकवल
जमिन विकुन मुलीच लग्न
कस तरी जमवल
मी एक बाप आहे रे
देवा शेवटी
उपाशीपोटी झोपतो
लेकरांसाठी
मी एक बाप आहे
लेकरांसाठी झटणारा
त्यांच्या सुखासाठी
दु:ख पोटी घालणारा
बापाच काळीज मी
अनुभवल आहे
माझ्या बापाच दु:ख मी
अनुभवल आहे
बापाच काळीज देवा
लेकरांना कस कळणार
घराच्या सुखासाठी
एकटी बायको किती पळणार
श्रीकृष्ण जगन्नाथ चाटे
रा. वरवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड, मोबाईल – 82638 29045