September 19, 2024

Month : March 2023

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणव्याबाबत गोवा सतर्क, केली ही उपाययोजना..

गोव्यातील जंगल क्षेत्रातील 40 वणव्यांवर थेट देखरेखकरण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन गोवा राज्यात मार्च, 2023 पासून  जंगले, खाजगी क्षेत्रे, सार्वजनिक जमीनी ,बागा , महसुली जमीन इत्यादींसह विविध भागात अनेक ठिकाणी वनवे लागल्याचे आढळले आहे आणि त्यांची नोंद करण्यात आली आहे. वणव्यांच्या या  स्थानिक घटनांकडे  सर्वोच्च प्राधान्याने लक्ष देण्यासाठी आणि त्यांची ठिकाणे सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने  नैसर्गिक संसाधनांसह जीवित आणि मालमत्तेची किमान  हानी सुनिश्चित करण्यासाठी ,मनुष्यबळ आणि साहित्याची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने गोव्यातील वन विभागाने , जिल्हाधिकारी (उत्तर गोवा ), जिल्हाधिकारी (दक्षिण गोवा ), एसपी (उत्तर गोवा ), एसपी (दक्षिण गोवा ) आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयासारख्या इतर विभागांशी समन्वय साधला आहे.  सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अतिदक्षता घेण्याचा  इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जात आहे आणि  सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. जंगलातील वणव्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी वनविभागाने आत्तापर्यंत  उचललेली  पावले – आगीवर  प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी 24 कार्यरत  नियंत्रण कक्ष: एफएसआय विभागाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या  यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष देखरेखीसाठी 24 तास कार्यरत  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आगीच्या घटनास्थळी  ताबडतोब उपस्थित राहण्यासाठी अचूक भौगोलिक निर्देशांक आणि वणव्यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांकानुसार रियाल टाइम नकाशे क्षेत्रीय   कार्यकर्त्यांना सामायिक केले जात आहेत . आगीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभारी म्हणून वनक्षेत्र विभागांमध्ये विभागलेले उप वनसंरक्षक / सहाय्यक वन संरक्षक  स्तरावरील अधिकारी नियुक्त: वणव्यांनी प्रभावित क्षेत्रे हे अनेक क्षेत्रांमध्ये  विभागण्यात आली आहेत आणि डीसीएफ  आणि एसीएफ  स्तरावरील अधिकाऱ्यांना वणव्यांच्या घटनास्थळी तात्काळ उपस्थित राहण्यासाठी कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत.750 हून अधिक लोक यासाठी कार्यरत आहेत. वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेशांवर बंदी, प्रवेश रोखण्यासाठी वन आणि वन्यजीव कायद्यांची कडक अंमलबजावणी : वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेश तपासण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी, वन कायद्यांची सुनिश्चित आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपवन संरक्षकांना विशिष्ट निर्देश देखील देण्यात आले आहेत. संबंधित विभागांशी समन्वय : आगीच्या घटनांचे युद्धपातळीवर तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी  पीआरआयसह जिल्हाधिकारी (उत्तर)/(दक्षिण), पोलीस विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, स्थानिक समुदाय यांची  संयुक्त पथके समन्वयाने तैनात आहेत....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बारामतीमधील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा एक ऐतिहासिक अन् क्रांतिकारी प्रयोग

बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचे  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते उद्घाटन बारामती – ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा  देशी गोवंश...
सत्ता संघर्ष

कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुग

कृषी औद्योगिक विकासाचे यशवंतयुगलोकशाही ही लोकांची, लोकांच्यासाठी लोकाद्वारे राबविली जाणारी व्यवस्था आहे. परंतू लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानत असलो तरी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत आणि...
विश्वाचे आर्त

मनाच्या स्थिरतेसाठी विचार शून्य व्हायला हवेत

विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे. विचार शून्य कसे होतात ? विचार कसे थांबतात ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या…देशी वृक्षांच्या बीजांचा संग्रह करण्याचा हंगाम

सुमारे १५० देशी वृक्ष, झुडपे व वेली यांची शास्त्रीय नावे आणि बीज संग्रह करण्याचा हंगाम यांची माहिती…. संकलन – योगेश नेताजी चौधरी, हिंजवडी, पुणे मोबाईल...
मुक्त संवाद

खासगी शिकवण्या – एक शैक्षणिक धंदा

नामांकित सरकारी महाविद्यालयापेक्षा नामांकित खाजगी शिकवणीला प्रवेश घेणे प्रतिष्ठेचा प्रश्न मानला. त्यातही कहर म्हणजे शिकवणीसह एकात्मिक महाविद्यालय (Integrated College) घेणे कसे गरजेचे आहे हे पालकांना...
काय चाललयं अवतीभवती

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार दिले जाणार...
विश्वाचे आर्त

ज्ञानाची पेरणी केल्यास पीकही ज्ञानाचेच उगवणार

तणाचे बी पेरावे लागत नाही, ते आपोआपच उगवते. तणांचा नाश केला तरी शेतात तण हे उगवतेच. असेच अज्ञानाचे आहे. अज्ञानाचे बी एकदा शेतात पडले तर...
विशेष संपादकीय

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्‍न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी

बजेट 2023  – आज तुकाराम बीज. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!