- पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र प्रारुप अधिसूचना प्रसिध्द
- जिल्ह्यातील ३११ गावांचा समावेश ; ६० दिवसात मागवल्या हरकती, सूचना
रत्नागिरी : भारत सरकार राजपत्र, पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय प्रारूप अधिसुचना दिनांक ३१ जुलै २०२४ अन्वये पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील (WESTERN GHAT ECO- SENSITIVE AREA) क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसुचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गांवे, खेड तालुक्यातील ८५ गांवे, लांजा तालुक्यातील ५० गांवे, राजापूर तालुक्यातील ५१ गांवे आणि संगमेश्वर तालुक्यातील ८१ गांवाचा अशी एकूण ३११ गांवाचा समावेश करण्यात आला आहे.
या अधिसुचनेस अंतिमस्वरूप प्राप्त होण्यापूर्वी प्रारूप अधिसूचनेत नमुद केलेल्या क्षेत्रातील (गांवातील ) लोकप्रतिनिधी / स्थानिक रहिवासी यांना कोणत्याही प्रकाराच्या सूचना, हरकती / अगर तक्रार असल्यास, त्यांनी Environment Protection Act, १९८६ आणि नियम १९८६ मधील तरतुदीनुसार त्यांचे सुचना, आक्षेप लेखी स्वरूपात ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे किंवा ई-मेल आयडीवर est-mel@nic.in नोंदविणे आवश्यक आहे.
भारत सरकार राजपत्र, पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय प्रारूप अधिसुचना दिनांक ३१ जुलै २०२४ अन्वये पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील (WESTERN GHAT ECO- SENSITIVE AREA) क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसुचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण ३११ गावांचा या अधिसुचनेमध्ये समाविष्ट असून त्यांचा तालुकानिहाय तपशील असा –
चिपळूण तालुक्यातील आडरे, अकुशंखा नगर, आनारी, बामणोली, डेरवण, धाकमोली, दुर्गेवाडी, दुर्गवाडी खुर्द, गाणे, गणेशपूर, कादवड, कळकवणे, कामथे खुर्द, खरवते, खोपड, कोळकेवाडी, कोड फणसवणे, कोंडमळा, कुडप, कुभांर्ली, कुटरे, मजरे ( गोवळ), मंजुत्री, मोरवणे, मुंढे तर्फे चिपळूण, मुंढे तर्फे सावर्डे, नांदीवसे, ओवळी, पाथे, पेढांबे, पेढे- पर्शुराम, फरूस, पोफळी,पोफळी बुद्रक, रिक्टोली, शिरगांव, स्वंयदेव, तळवडे, तळसर, टेरव बुद्रक, तिवडी, तिवरे,तुरंवव, उभाळे अशा ४४ गांवाचा समावेश आहे.
खेड तालुक्यातील ऐनी, अंबडस, आंबवली, अष्टी मोहल्ला, आस्तान, बजरंग नगर, बेलसाई बुध्दवाडी, बेलसाई चौथाई, बिरमणी, चाटव, चिंचवडी, चोरवणे, चोरवणे उत्तेकरवाडी, दहिवली, देवघर, धामणंद, धामणंद गावटान, देवधे, दिवाण खवटी, घेरारसाळगड, घेरा पाळगड,घेरासुमारगड, घोग्रे, हुभरी, जामगे, जावळी गावठाण, कळबंणी बुद्रक, कळबंणी खुर्द,कांदोशी, कर्टल, कसबा नातू, कसाई, कवळे, कळणे, खालची हुंबरी, खोपी, खोपी तांबटवाडी, किंजळे तर्फे खेड, किंजळे तर्फे नातू, कोंडवाडी, कुंभाड, कुंबवली, कुरवळ गावठाण, मिलें, मोरवंडे खुर्द, नादगांव, नंदीवली, नवानगर, निवे, पाखरवाडी, पासरे बुद्रक, पासरे खुर्द, पोयनार खुर्द, प्रभुवाडी, पुरेखर्दु, साखर, साखरोली, साखरोली खुर्द, सनगर, संगलोट, सार्पिली, शिंगरी, शिरगांव, शिरगांव खुर्द, शिवखुर्द, शिवतर, तळवट जावळी, तळवट खेड, तळवट पाल, तिसंगी, तिसेखुर्द, तुळशी बुद्रक, तुळशी खुर्द, वारवली, विहाळे, वडगांव बुद्रक, वडगांव खुर्द, वाडीबीड, वाडीमलदे, वाडीबेलदार, वावेचिचटवाडी, वावे जाभूळवाडी, वावे तर्फे खेड, वावे तर्फे खेड गावठाण, झागडेवाडी अशा 85 गावांचा समावेश आहे.
लांजा तालुक्यातील आगरगांव, आरगांव, बोणखोर, बापरे, भाडे, भावंड, बोरथडे, युध्दवाडी तर्फे वेरवली बुद्रक,चाफे, चिंचुटी, डाफळे, गुरववाडी, हचे, हर्दखळे, हसोल, इसवली, जायदे, कांगवली, कांटे,कातळगांव, खानवली, खोरगांय, खोरनिनको, कोचरी, कोंडगे, कोंडगांव, कुडेवाडी, कुंभारगांव, कुरंग, कुरचुवं माचाळ, माजळ, नामे, नियाशी, पालू, पानोरे, पाटीलगांव, प्रभानवल्ली, पुरगांव, रामगांव, रायरी, रिंगणे, रूण, सालपे, शिरवंयल्ली, वेरळ, वेसुले विलवडे, वाग्रट, वाकेड अशा 50 गावांचा समावेश आहे.
राजापूर तालुक्यातील आगरेवाडी, बाग काझी हुसेन, बांदीवडे, भराडे, चिखले, धामणपे, डोंगर, गोठणे दोनीवडे, हरळ, हदी, हासोळ तर्फे सीदंळ, हत्तडे, जांभवली, काझीरडा, करक, करीवली, केळवडे, खिंगणी, कोळब, कोळण खाडी, कोंडदसुर, कोंडसर खुर्द, कोतापूर, कुंभावडे, म्हाळुंगे, मिलंद, मोसम, ओसीवळे, पाचळ, पहिलीवाडी (ताम्हाणे ), पाल्ये, पांगरी बुद्रक, पांगरी खुर्द, पन्हाळे तर्फे सौदंळ, पुरूळे, पाथर्ड पाटकरवाडी, फुपेरे, प्रिदांवन, कोंडे राजापूर (म्यु.), सौर्दळ , सावडव, शेजवली, तिवरे, वाल्ये, वरची गुरववाडी, वरचीवाडी, वाळवड, वाटूळ, येडब, झऱ्ये अशा एकूण 51 गांवाचा समावेश आहे.
संगमेश्वरमधील आगरेवाडी, आंबेत, अणदेरी, आंगवली, असावे, आसुडे, बामणोली, बेलारी बुद्रक, बेलारी खुर्द, बेलारी वाडी, भांडखंबे, भोवडे, बोंडे, चांदीवणे, चाफवली, डाखीण, देवधे देवाळे घेराप्रचीतगड, देवघर, धामणी, डिगंणी, गोळवली, गोठणे, हात्तीव, हेदळी, कारंडेवाडी, कासे, कातवली, कातुर्डी कोंड, खडी कोळवण, किंजळे, किरबेट, कोंडअंबेड, कोंडभैरव, कोंडओझरे, कोंडरन, कुचांबे, कुळे, कुभांरखाणी बद्रुक, कुभांरखाणी खुर्द, कुंडी, कुरधुंडा, कुटगिरी,मळदेवाडी, मांजरे, मसरंग, मठ धामापूर, मावळंगे, मुर्शी, नायरी, निगडवाडी, निनावे, निवळी, निवदे, ओझरेबुद्रक, पांचाबे, फणसावळे, पिरंदवणे, राजवली, रांगव, रातांबी, संगमेश्वर,सायली, शेववणे, शेनवडे, शिंदे आंबेरी, शिरंबे, श्रृगांरपुर, सोनारवाडी, तळवडे तर्फे देवरूख, तांबेडी, ताम्हणळे, थोरली धामणी तिवरे घेराप्रचितगड, तुरळ, उमरे, उफळे, विकासनगर,वाडी आधिष्टी, वाशी तर्फे संगमेश्वर अशा 81 गांवाचा समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.