आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495
सप्टेंबरच्या १२ ते १६ दरम्यानचा दुसऱ्या आवर्तनातील अपेक्षित पावसाची तीव्रता सध्या कमी जाणवत असुन तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे. परंतु ह्याच दुसऱ्या आवर्तनातील मध्यम पाऊस शुक्रवार दि. २० सप्टेंबर पासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात मात्र सध्या चालु असलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
मंगळवार ( दि.१७ सप्टेंबर) पासूनही विदर्भात तर शुक्रवार (दि.२० सप्टेंबर) पासून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातही पुन्हा मध्यम पावसाची शक्यता वाढली आहे.
सप्टेंबर महिन्यातील २५ ते २९ सप्टेंबर दरम्यानची तिसऱ्या व शेवटच्या आवर्तनाची शक्यताही टिकून आहे. त्यामुळे त्या पावसाची अपेक्षाही करू या!
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या स्पष्ट कमी दाबांचे क्षेत्रे ही विकसित होवून अतितीव्र कमी दाबात रूपांतर होण्याबरोबरच त्यांचा वायव्य आणि पश्चिम दिशेकडे मार्गस्थ होण्याचा त्यांचा सध्याचा वातावरणीय कल ही एक जमेची बाजू समजू या!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.