February 9, 2023
.Mormon rose Helen and Mime butterfly
Home » स्वलोटेल कुळातील फुलपाखरे
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वलोटेल कुळातील फुलपाखरे

स्वलोटेल कुळातील ही फुलपाखरे सर्वत्र दिसणारी आणि बऱ्यापैकी मोठ्या आकाराची असल्याने सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

प्रतिक मोरे, पर्यावरण अभ्यासक

ब्लु मॉर्मन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. कॉमन मॉर्मन चे नर मादी हे वेगवेगळे दिसतात.. (sexual diamorphism) यांची खाद्य वनस्पती लिंबू बेल कडीपत्ता अशी सिट्रस फॅमिली मधील वनस्पती आहेत. मधुरस पित असली तरी प्रजननासाठी आणि इतर आवश्यक पोषणमूल्य मिळवण्यासाठी ही फुलपाखरे चिखलपान करतात. Lime swallowtail हे सुद्धा लिंबाच्या झाडावर आपली अंडी देते. कॉमन आणि क्रिमसन रोस ही फुलपाखरे बदक वेली वर अंडी देतात. ही बदकवेल विषारी असल्याने यांचे सुरवंट ही विषारी द्रव्ये आपल्या शरीरात साठवतात आणि प्रौढावस्थेत ही द्रव्ये शरीरात धारण करत असल्याने भक्षक यांना टाळतात. तसेच शरीरावरील लाल रंग या विषारी असण्याचा धोका दर्शवतात. यांच्या या गुणधर्माचा फायदा कॉमन मॉर्मन च्या माद्या उचलतात आणि त्या या फुलपाखरांची मिमिक्री करून त्यांच्यासारख्या दिसतात पण विषारी नसतात. रेड हेलन हे थोडेसे सह्याद्रीच्या जंगली आणि वृक्षाच्छादित भागात दिसते. याची खाद्य वनस्पती तिरफळ आहे.. आपल्या बागेत समई, एक्झॉरा, जास्वंद तगर अशी फुले असतील तर ही स्वलोटेल रसपानासाठी नक्की येतील..

Related posts

आदमापूर येथील संत बाळुमामा भंडारा सोहळा

कळंबा तलाव ओव्हर फ्लो…

डॉ. पराग हळदणकर यांना चढ्ढा पुरस्कार

Leave a Comment