मन
मन हे पाखरू
उडते भिरभिर
वाऱ्यासम वाहते
विचार दिशा वळवते भरभर
मनाचा गाभारा
शोध रे पामरा
अथांग सागर
मनाला नेईल कुठवर
मन हे मवाळ
मनाचा प्रवाह
वाहतो निर्मळ
मनाच्या झऱ्याला खळखळ फार
मनाचा आठव
मनातील साठव
मनाच्या भावना
मोकळ्या करून मनाला सावर
मन हे चंचल
नेईल कुठवर
मनचक्षूंनी पहावे
मनपटलावर
कवी : चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.
8208667477.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.