April 19, 2024
Phulasarkh Japne poem by Dr V N Shinde
Home » फुलासारखं जपणं…
कविता

फुलासारखं जपणं…

फुलासारखं जपणं...

सोडूनिया माहेरा
लेक निघता सासुरा
सासरा बोलें जावया
फुलासारखं जपाया
पण  
फुलासारखं जपायचं
म्हणजे काय करायच
अर्थ नसतो माहित 
अनं कोणीच नाही सांगत
माझ्याही
तोंडी हे वाक्य  होतं आलं 
जेव्हा लेकीचं लग्न झालं 
अर्थ माहित नव्हता म्हणून
जावयाला नाही सांगितलं 
पण...
आज,
निसर्गानं सोदाहरण सांगितलं 
पानांन ऊन झेलायचं
आणि
फुलाला सावलीत फुलू द्यायचं
म्हणजे असतं फुलासारख जपायचं

डॉ. व्ही. एन. शिंदे

Related posts

सौंदर्य !…

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

Leave a Comment