मुंबई – येथे एलफिन्स्टन महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने एलफिन्स्टन महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण घेण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सौमित्रा सावंत, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. भावना पाटोळे उपस्थित होते.
इतिहास विभाग नेहमीच मोडी लिपीच्या अभ्यास, व प्रसारासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित करीत असतो. मोडी लिपी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वाना हे वर्ग नक्कीच फायदेशीर ठरतात.
डॉ. भावना पाटोळे
कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी Digitization डिजिटायझेशनमुळे मोडी लिपी लिहिणे, वाचणे व संवर्धन करणे सोपे झाले आहे. त्यामुळे मोडी लिपी शिकून तिचा प्रसार करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
संचालक सुजितकुमार उगले यांनी मोडीचा प्रसार झाला अभ्यासक तयार झाले तर पुराभिलेख संचालनालयातील लाखो कागदपत्रे वाचणे शक्य होणार आहे हे स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. सौमित्रा सावंत यांनी मनोगतात विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी नवीन उपक्रम राबवणे ही महाविद्यालयाची भूमिका असून इतिहास विभागातर्फे घेण्यात आलेल्या हेरीटेज वॉक, हेरीटेज फोटोग्राफी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचा उल्लेख करून सर्व प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या. डॉ. शीतल पंचीकर यांनी सूत्रसंचालन केले. या वर्गास 124 प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
