चाकवत…एकदम मस्त
इंग्रजी नाव – White goosefoot
शास्त्रीय नाव – Chenopodium album
हिवाळ्यात येणारी चाकवत भाजी आवडीने खाल्ली जाते. तिचे गरगटे अर्थात पातळ भाजी खूप छान लागते.
चाकवतामध्ये उत्तम दर्जाची प्रोटीन्स आहेत. याचबरोबर लोह चांगले आहे कॅल्शियम आहे.
विटामिन बी ग्रुप असल्यामुळे चाकवताची भाजी चांगली एनर्जी देते.
चाकवतामध्ये पोटॅशियम देखील आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
चाकवतामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
चाकवत नियमितपणे खाल्ल्यामुळे केस गळायचे थांबतात आणि वाढ चांगली होते.
शरीरातील दुर्बलता दूर करण्याचे काम चाकवत करते.
चाकवतामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे प्रतिकारशक्ती देखील वाढते.
चाकवत नक्की खा आणि मस्त रहा!!
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, सासने ग्राउंड जवळ,
कोल्हापूर मोबाईल – 7499891805
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.