उन्हाची झळ वाढली पिकांना ताण सहन करावा लागणार
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
काल मंगळवार ( दि. १३ऑगस्टला) ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा हे आठ जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे भाग बदलत सरासरीपेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवले. पण ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा या आठ जिल्ह्यात मात्र हेच तापमान २६ ते २८ डिग्री से.ग्रेड दरम्यान होते.
कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते. त्यामुळे हवेत दमटपणा जाणवून खरीप पिकांना पाण्याची ओढ बसु शकते. शिवाय वाढत्या दमटपणातून पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमाल तापमान वाढ व भारत महासागर विषुवृत्तीय परिक्षेत्रात, एम.जे.ओ. च्या उपस्थितीत पुढील १० ते १२ दिवस म्हणजे २५ ऑगस्टपर्यन्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून विजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र शनिवार (दि १७ ऑगस्ट) पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.