February 5, 2023
Sant Sahitya Award Scheme by Matrumandeer Nigadi Pradhikaran
Home » संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा
काय चाललयं अवतीभवती

संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी संत वाड्.मय अभ्यासावर आधारित साहित्य पुरस्कार देण्यात येतात. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाइ.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध झाले पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. असें वाड्.मय विविध शाळांना सुचवता यावे, वाड्.मय वाचकांसमोर ठेवणारे लेखक आणि प्रकाशक यांना प्रोत्साहन मिळावे, पुरस्काराच्या निमित्ताने लेखक आणि प्रकाशक वाचकांसमोर यावेत या हेतूने संत वाड्.मयविषयक पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारांचे वितरण प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी या ठिकाणी होते. तरी या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन मातृमंदिर संस्थेच्यावतीने कार्यवाह य. ल. लिमये व सुधीर कुलकर्णी यांनी केले आहे.

पुरस्कार योजनेसाठी गेल्या दोन सौर वर्षात प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. संत साहित्याचे परीक्षण ( टीका , विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा , कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य ) आदी साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येतो. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांच्या लेखकांना अनुक्रमे १०,००० रुपये आणि ८००० रुपये असे दोन पुरस्कार (यातील ६० टक्के रक्कम लेखकांस आणि ४० टक्के रक्कम प्रकाशकांस ) देण्यात येणार आहे. त्याशिवाय बालवाड्.मयातील ( १०० पृष्ठांच्या आतील ) संतकथा , संतचरित्र , संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना प्रत्येकी २५०० रुपयांचा पुरस्कार रुपात देण्यात येणार आहे. पुस्तके मराठी भाषेतील तथापि कोणत्याही भारतीय संताविषयीची असावीत. संत कोणत्याही कालखंडातील असले तरी चालेल, असे कार्यवाह लिमये यांनी सांगितले आहे.

पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती सौर ९ भाद्रपद (३१ ऑगस्ट ) पर्यंत संस्थेच्या मातृमंदिर विश्वस्त संस्था, द्वारा – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय , पेठ क्र. २५ ,निगडी प्राधिकरण , पुणे ४११०४४ या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी संपर्क ९७६५१३५७६९

Related posts

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत

दोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…

Leave a Comment