आयुष्याचा राग तु,
जगण्याचा भाग तु….
आयुष्याचा चंग तु,
जगण्याचा रंग तु…..
आयुष्याची वाट तु,
सुंदरशी भेट तु…..
आयुष्याची वेली तु,
जगण्याची खोली तु…..
आयुष्याचे गित तु,
जगण्याची प्रित तु…..
आयुष्याचे भान तु,
जगण्याचा मान तु….
अशी तु एक,
तुझी रुपे अनेक,
तु मायेची सावली,
तु माऊली…..
तु पत्नी,
सदा प्रयत्नी…..
तु लेक,
आनंदाचा चेक….
तु माता,
तुझ्याविना रिता…..
तु ताई,
दुसरी आई….
तु मैत्रीण,
दुसरी वाघीण….
अशी तु, एक अनंत,
तुझ्यामुळेच दरवळला आसमंत….
कवी – श्रीकांत धोटे