हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५’ जाहीर केले. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींवर आधारित या पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. नवीन सोळंके (मराठी विभागप्रमुख, नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ) आणि प्रा. डॉ. बाबुराव खंदारे (मराठी विभागप्रमुख, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, हिंगोली) यांनी काम पाहीले.
पुरस्कार वितरण सोहळा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
घोषित पुरस्कार पुढीलप्रमाणे —
🌹 आत्मकथन साहित्य पुरस्कार
काय भुललासी वरलीया रंगा? – प्रदीपराव साने, बेरविक, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
ब्युटी ऑफ लाइफ – द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर – आशा नेगी हिरेमठ, पिंपरी चिंचवड, पुणे
🌹 काव्य साहित्य पुरस्कार
भाऊसाहेब कांबळे ममदापूर, निपाणी (भरारी), शरद अत्रे, पुणे (नात्यांचा पारिजातक), विवेक उगलमुगले, कामटवाडे, नाशिक (मनातल्या मनात वाचायच्या कविता), दत्तात्रय पाटील, जरगनगर, कोल्हापूर (मोगरा फुलला), शिवाजी नामपल्ले, कराडनगर, अहमदपूर, जि. लातूर (आधारवड)
🌹 कथा साहित्य पुरस्कार
गोकुळ गायकवाड, जामखेड जि.अहिल्यानगर (ताटातूट), आरती लाटणे, खोतवाडी ता. हातकणंगले (मायेचं गाठोडं), रसुल सोलापुरे, महागांव ता. गडहिंग्लज (पठारावरचा दौलती)
🌹 कादंबरी साहित्य पुरस्कार
सचिन अवघडे, माहुली ता. खानापूर (फक्कड), भूपाळी निसळ, अहिल्यानगर (उर्णा), विद्या भोरजारे, बोईसर जि. पालघर (कांची), मोतीराम राठोड, काळेश्वरनगर, विष्णुपुरी, नांदेड (वचपा)
🌹 समीक्षा साहित्य पुरस्कार
डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव (कन्नड दलित साहित्य), डॉ. राजेंद्र खंदारे, नातेपुते, जि. सोलापूर (साहित्यातील समाजदर्शन), डॉ. कमल दणाणे, सम्राटनगर, कोल्हापूर (बाबुराव गायकवाड यांचे कथालेखन)
🌹 संशोधन साहित्य पुरस्कार
डॉ. लहू कुरणे, आष्टा, जि. सांगली (मराठी दलित कथेतील स्त्री जीवन), डॉ. खंडेराव शिंदे, पुसेगाव, जि. सातारा (रुकडी गावचा इतिहास)
🌹 संपादन साहित्य पुरस्कार
बाळासाहेब देशमुख, सहकार बँक कॉलनी, केडगाव (आबा मास्तर)
🌹 अनुवादित साहित्य पुरस्कार
डॉ. किशोर इंगोले, हिंगोली (Dialogue My Life)
🌹 बालसाहित्य पुरस्कार
मोहन काळे, कोपरखैरणे, नवी मुंबई (एकदा आपण व्हावे मोर), सौ. वर्षा ननवरे, इंदापूर (कवितेच्या अंगणात), उद्धव भयवाळ, छत्रपती संभाजीनगर (जादूचा आरसा)
🌹 वैचारिक साहित्य पुरस्कार
सत्यवान मंडलिक, येडे मच्छिंद्र, जि. सांगली (स्वातंत्र्याची ७५ वर्षे), शीला माने, इचलकरंजी (थोर समाज सुधारक)
🌹 ललित साहित्य पुरस्कार
सारिका आडविलकर, मडगाव, गोवा (नवस्पंदन), निर्मला शेवाळे, वांद्रे, मुंबई (करंजमाळ), डॉ. संगीता म्हसकर, एरंडवणे पुणे (इंद्रधनुष्य)
🌹 प्रवास वर्णन पुरस्कार
डॉ. सुनिता चव्हाण, बोरिवली, मुंबई (वारी निसर्गरंगांची!)
🌹 गझल साहित्य पुरस्कार
डॉ. स्नेहल कुलकर्णी, गारगोटी, जि. कोल्हापूर (दिशांतर), विनायक कुलकर्णी, कुपवाड फाटा, सांगली (आभार वेदनांचे), डॉ. लक्ष्मण शिवणेकर, भाईंदर पू. (गझलामृत)
या पुरस्कारांद्वारे देशभरातील मराठी साहित्यिकांची विविध क्षेत्रातील सर्जनशील कामगिरी गौरविण्यात आली आहे. प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी सांगितले की, “संत नामदेवांच्या संतविचारधारेप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज साहित्याद्वारे पुढे आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या पुरस्कारामुळे नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन मिळेल.”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
