पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि कामगिरी यांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषदेला केले संबोधित
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि कामगिरी याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांना माहिती दिली.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपल्या जीवनाचा आधार देखील आहे आणि 140 कोटी देशवासियांना अन्न सुरक्षा प्रदान करणे ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे. शेतकरी हा शेतीचा आत्मा आणि प्राण आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आमच्याकडे सहा कलमी रणनीती आहे.
पहिले – उत्पादन वाढवणे, दुसरे – उत्पादन खर्च कमी करणे. शेतकऱ्यांना वेळेवर स्वस्त दरात खते मिळावीत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
केंद्रीय मंत्री म्हणाले की 100 दिवसांमध्ये आणखी एक विशेष काम झाले आहे ते म्हणजे डिजिटल कृषी मिशन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पारंपारिक पिकांसोबत बागायती पिकांचे उत्पादन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही 9 आधुनिक केंद्रे स्थापन करत आहोत.
माध्यमांना माहिती देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 100 दिवसांमधील प्रमुख कामगिरीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पीएम-किसान, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM –AASHA), डिजिटल कृषी अभियान , कृषी सखी, कृषी विषयक पायाभूत सुविधा निधी (AIF), शेतकरी उत्पादन संघटना (FPO): स्वच्छ रोप कार्यक्रम (CPP): राष्ट्रीय कीड देखरेख प्रणाली (NPSS) , प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) आदी योजनांचा उल्लेख केला.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (DARE) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या 100 दिवसांमधील उल्लेखनीय कामगिरीची देखील माहिती दिली.
100 दिवसांमधील ठळक कामगिरी
हवामानाशी जुळवून घेणाऱ्या दर्जेदार 109 वाणांचे लोकार्पण आणि त्यांचे भविष्यातील परिणाम: गेल्या 100 दिवसांमध्ये , 34 धान्य पिके आणि 27 बागायती पिकांसह 61 पिकांच्या 109 विशेष संकरित वाणांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. कृषी शिक्षणाची प्रवेश प्रणाली ऑनलाइन करण्यात आली.
कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून (केव्हीके) शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .त्याचबरोबर नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.