माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता सैन्य भरती
रत्नागिरी : युध्द विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्या/भावाकरिता आर्मी मेडिकल कोर आणि लखनऊ येथे 4 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर 2024 रोजी हेडक्वॉटर्स युनीट कोटा मधून Sol Tech ( nur Asst) या पदाकरिता सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे.
तरी इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्यांनी तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य/भाऊ यांनी भरतीकरिता आयोजित तारखेला संबंधीत ठिकाणी सकाळी 5 वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. आपला अर्ज 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत uhq2024@joinamc.in या लिंकवर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.