📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे

Retired IAS officer and author Leena Mehendale selected as president of the first women government officers Marathi literary conference in Delhi.

दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) लीना मेहेंदळे यांची निवड

नवी दिल्ली: येथे 11 व 12 एप्रिल 2026 या दिवशी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सरहद संस्था, पुणे, नवीन महाराष्ट्र सदन यांच्या वतीने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. हे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय (निवृत्त) अधिकारी 1974 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्या लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी केली आहे.

लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील धरणगांव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी गोवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे सर्वच महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर 500 पेक्षा अधिक लेख आणि 24 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची 19 पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गाोपचार, प्रशासकीय सुधारणा हे त्यांचे आवडते विषय आहेत. संगीचाचीही त्यांना आवड आहे.

संयोजन समितीतील सदस्यांनी विविध नावांची चर्चा करून पैकी ज्येष्ठता आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून लीना मेहेंदळे यांची निवड एकमताने केली आहे.

Related posts

कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

WordCamp Kolhapur 2026 साठी मीडिया पार्टनरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लखलखत्या दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात अंधारच

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar