January 26, 2025
Masters Shadow Literary Award announced
Home » ‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर

‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर
डॉ प्रदीप आवटे, प्रा सुजाता राऊत,डॉ. योगिता राजकर, सुनील उबाळे, सफरअली इसफ, मधुकर मातोंडकर यांचा समावेश
स्वामीराज प्रकाशनच्या रजनीश राणे यांची माहिती

मुंबई – येथे १ मार्च रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मरणार्थ ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात पुणे येथील लेखक डॉ. प्रदीप आवटे, मुंबई येथील लेखिका प्रा. सुजाता राऊत, वाई येथील कवयित्री डॉ. योगिता राजकर, छत्रपती संभाजीनगर येथील कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे, सोलापूर येथील कवी सफरअली इसफ आणि सिंधुदुर्ग येथील सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांचा समावेश असल्याची माहिती स्वामीराज प्रकाशनचे संचालक रजनीश राणे यांनी दिली

कविवर्य नारायण सुर्वे यांनी मुंबईतील कामगार वर्ग विशेषत: गिरणी कामगार यांना आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी आणून त्यांची सुखदुःखे मांडली. ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे ‘… असं आपल्या कवितेद्वारे म्हणून सुर्वेंनी कष्टकरी – शोषित वर्गाला न्याय देण्याचाही प्रयत्न केला. विद्यापीठाची पायरीही न चढलेल्या सुर्वे यांची कविता मात्र विद्यापीठाची मानबिंदू ठरली. या त्यांच्या ऋणाची आठवण ठेवण्यासाठी स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशनातर्फे आयोजित सुर्वे मास्तरांचे संमेलन निमित्त ‘मास्तरांची सावली’ या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यात डॉ. प्रदीप आवटे यांच्या सकाळ प्रकाशन प्रकाशित ‘आणखी एक स्वल्पविराम’ या कुमार कादंबरीला, प्रा. सुजाता राऊत यांच्या सृजन संवाद प्रकाशित ‘मातीत मिसळण्याची गोष्ट’ या ललित लेख संग्रहाला, डॉ. योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन प्रकाशित ‘बाईपण’ या दीर्घ काव्यसंग्रहाला, कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे यांच्या गोदा प्रकाशन प्रकाशित ‘उलट्या कडीचं घर’ या काव्यसंग्रहाला आणि मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या एकूण सांस्कृतिक – साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ‘मास्तरांची सावली’ पुरस्कार देण्यात आले आहेत. १ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या सुर्वे मास्तरांच्या संमेलनात या पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. राणे यांनी दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading