February 19, 2025
Need for a brief study of the reasons for the decline in camel numbers
Home » उंटांची संख्या कमी होण्याच्या कारणांचा संक्षिप्त अभ्यास करण्याची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उंटांची संख्या कमी होण्याच्या कारणांचा संक्षिप्त अभ्यास करण्याची गरज

आंतरराष्ट्रीय उंट वर्ष उपक्रमाचा एक भाग म्हणून बिकानेरमध्ये ‘स्ट्रेंथनिंग कॅमल मिल्क व्हॅल्यू चेन इन इंडिया’ विषयावर स्टेकहोल्डर/ भागीदारांच्या कार्यशाळेचे आयोजन

बिकानेर – संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आयसीएआर – राष्ट्रीय उंटावरील संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने ‘भारतातील उंटाच्या दुधाच्या मूल्याची साखळी मजबूत करणे’  या विषयावर एक दिवसीय भागधारक कार्यशाळेचे आयोजन राजस्थानमधील बिकानेर येथे केले होते.

नॉन-बोवाइन (उंट) डेअरी व्हॅल्यू चेनच्या शाश्वत विकासात योगदान देऊ शकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांच्या पोषणात्मक आणि उपचारात्मक मूल्यांसह विविध भागधारकांमधील संवादाला चालना देणे, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

या कार्यक्रमात राजस्थान, गुजरात या राज्यातील उंट पाळणारे, सरकारी अधिकारी, सामाजिक उपक्रम, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ तसेच राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरण, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था – कर्नाल, सरहद डेअरी – कच्छचे प्रतिनिधी 150हून अधिक व्यक्तींचा सहभाग होता. याशिवाय  लोटस डेअरी आणि अमूल यांनी देखील यात सहभाग घेतला. सहभागींनी भारतातील नॉन-बोवाइन दूध क्षेत्रासमोरील आव्हाने ओळखण्यासाठी, विशेषतः उंटाचे दूध आणि मूल्य-साखळीतील सर्व भागधारकांना सामावून घेऊन उंटपालकांच्या विकासासाठी शाश्वत उपाय शोधण्यासाठी विचारमंथन केले.

मुख्य भाषणादरम्यान, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागा(डीएएचडी), च्या सचिव अलका उपाध्याययांनी भारतातील कमी होत चाललेल्या उंटांच्या संख्येवर प्रकाश टाकला. शाश्वत चराऊ जमीन सुनिश्चित करण्यासाठी आणि उंट-पालन समुदायांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन मिशनच्या भूमिकेवर भर देत संख्येतील त्यांची आणखी घट रोखण्यासाठी त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.

उंटाच्या दुधाच्या मूल्य साखळीची गरज अधोरेखित करून, त्यांनी उंट संवर्धनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देताना त्याच्या आर्थिक क्षमतेवर भर दिला. उंट पाळणाऱ्यानी  त्यांची आव्हाने समजून घेण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान आणि भारतातील उंटांचे भविष्य दोन्ही सुरक्षित करण्यासाठी तसेच लक्ष्यित हस्तक्षेप प्रदान करण्यासाठी अधिक प्रभावीपणे ही बाब हातळण्याचे  आवाहन त्यांनी केले.

डॉ. अभिजित मित्रा, पशुसंवर्धन आयुक्त, डीएएचडी यांनी देशातील उंटांची संख्या कमी होण्याच्या कारणांचा संक्षिप्त अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी उंटाच्या दुधाचे केवळ पूरक विचार करण्याऐवजी, त्याच्या पौष्टिक आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. उंटांसाठी न्यूक्लियस ब्रीडिंग फार्म आणि ब्रीडर्स सोसायट्यांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

“डीएएचडी आणि इतर प्रमुख भागधारकांसह सहयोगी प्रयत्नांद्वारे, एफएओ भारतातील नॉन-बोवाइन मिल्क व्हॅल्यू चेन बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सरकार, संशोधन आणि उद्योग यांच्यातील तज्ञांना एकत्रित करण्याचे आमचे ध्येय आहे. शाश्वत वाढीसाठी, उपजीविका वाढवण्यासाठी आणि पोषण आणि पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी नॉन-बोवाइन दुधाचे उपचारात्मक फायदे लक्षात घेऊन, आम्ही एक लवचिक, बाजार-चालित इकोसिस्टम तयार करू शकतो जी शेतकऱ्यांना सशक्त करेल आणि संपूर्ण देशात अन्न सुरक्षा सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताकायुकी हागीवारा, एफएओचे भारतातील प्रतिनिधी

राजस्थान सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. समित शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि राज्याने उंट क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या कारवाईची माहिती दिली. पशुमेळा, उंट स्पर्धा, इको-टूरिझम आणि मूल्यवर्धित उत्पादनांना प्रोत्साहन देऊन उंटांच्या संख्येचे संरक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

मुल्यवर्धनाचा मार्ग विकसित करण्यासाठी खरेदी, दुधाचे मानकीकरण, किमतीची यंत्रणा आणि बाजारपेठेतील व्यवहार्यता मजबूत करू शकणाऱ्या सामाजिक समावेशक संस्थात्मक मॉडेलच्या उभारणीसाठी संभाव्यता आणि आव्हानांवर भागधारकांकडून पुढील माहिती मागविण्यात आली. मूल्यवर्धन आणि उंटाच्या दुधाच्या किंमतीची यंत्रणा तसेच संशोधन विकासासह मूल्यसाखळी विकासाच्या महत्त्वावरही सविस्तर चर्चा झाली.

सरकारने उद्योजकांना दुग्ध प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर मदत करावी ज्यामुळे उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी मागणी चर्चेदरम्यान उद्योजकांनी  केली. कार्यशाळेत उंटांच्या संवर्धनासाठी त्यांच्या जातीच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला, उंटाच्या दुधाचे उपचारात्मक गुणधर्म आणि प्रजनन, उत्पादन, दुग्ध क्षमता, उत्पादन विकास आणि उंटाच्या दुधासाठी एक विशिष्ट बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मूल्य साखळी विकसित करणे आणि एकत्रित क्लिनिकल चाचणी घेणे या विषयी सुरू असलेल्या प्रयत्नाविषयी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान उंटांच्या आकर्षक  शर्यती आणि सजावट स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. “वाळवंट आणि उंच प्रदेशांचे नायक: पोषण करणारे लोक आणि संस्कृती” – या घोषवाक्यासह  हा कार्यक्रम यूएन इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स 2024 चा एक अविभाज्य भाग आहे. उंटांमुळे उपजीविका, अन्न सुरक्षा, पोषण आणि संस्कृतीत दिलेले महत्त्वपूर्ण योगदान ओळखणे आणि साजरा करणे आणि अशा प्रकारे शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करणे हे यातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या कार्यशाळेला अमुलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांचा आभासी सहभाग होता,याशिवाय गुजरातच्या पशुसंवर्धन विभागाच्या संचालक डॉ. फाल्गुनी ठकार, डॉ. आर. के. सावळ हे देखील उपस्थित होते. संचालक, एनआरसीसी, प्र-कुलगुरू, राजस्थान पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ, बिकानेर आणि श्री वालुमजीभाई हुंबळे, अध्यक्ष, कच्छ दूध संघ आदी मान्यवरांचा सहभाग होता. .

उंटांचा असलेल्या आणि सीमा गस्त आणि इतर सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बाजवणाऱऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रतिनिधींचाही या कार्यक्रमात सहभाग दिसला.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading