कोल्हापूर : मुळची कागलची आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेली संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलावंत ईशानी अरविंद हिंगे हिची राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय दर्जाच्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद Season 4’ या शोसाठी निवड झाली आहे. या कार्यक्रमाचा प्रसारण ३ जानेवारीपासून दररोज संध्याकाळी सुरु झाले आहे.
ईशानी गेली ८ वर्षे कला क्षेत्रात आहे आणि अवघ्या ५ वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत आहे. तिने विविध नाट्यसंगीत, अभंग, सुगमसंगीत, शास्त्रीय संगीत अशा गायन कला प्रकारांमधून पुणे, मुंबई, नाशिक, सूरत, जयपूर अशा ठिकाणी नाव लौकिक कमावले आहे. आठ हजार विद्यार्थ्यांमधून चौदा मुला-मुलींची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ईशानीची निवड झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह तिच्या मित्र परिवाराने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशानी हि फक्त गायनातच नव्हे तर अभिनयामध्येही कुशल आहे. तिने वेब सिरीज, मुव्हीज आणि नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने सुरत मध्ये इंडियाज टॉप मॉडेल ही पदवी पात्र केली आहे. तिला पंडित रघुनाथजी खंडाळकर, पद्मजा फेनानी- जोगळेकर, अपर्णा संत, अभिषेक मारोटकर याबरोबरच संग्राम संगीत विद्यालय यांचे मार्गदर्शन लाभले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
