November 21, 2025
National Gopal Ratna Awards 2025 announced by the Department of Animal Husbandry. Maharashtra’s Arvind Patil wins first and Shraddha Dhawan third in Best Dairy Farmer category.
Home » सर्वोत्तम दुग्ध उत्पादक श्रेणीत कोल्हापूरचे अरविंद पाटील प्रथम तर अहिल्यानगरची श्रद्धा धवन तृतीय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्वोत्तम दुग्ध उत्पादक श्रेणीत कोल्हापूरचे अरविंद पाटील प्रथम तर अहिल्यानगरची श्रद्धा धवन तृतीय

प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 ची घोषणा;
26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिनानिमित्त सोहळ्यात प्रदान केले जाणार
सर्वोत्तम दुग्ध उत्पादक श्रेणीत कोल्हापूरचे अरविंद पाटील प्रथम तर अहिल्यानगरची श्रद्धा धवन तृतीय

नवी दिल्ली – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 च्या विजेत्यांची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हा पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहे. हे पुरस्कार केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि जॉर्ज कुरियन याच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. हे पुरस्कार 26 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय दूध दिन समारंभाचा भाग म्हणून प्रदान केले जातील. या वर्षी एकूण 2,081 अर्ज प्राप्त झाले होते ज्यातून पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांना देशी गायी /म्हशींच्या जातींचे पालन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक या श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूर, महाराष्ट्र यांना प्रथम आणि कुमारी श्रद्धा सत्यवान धवन, अहिल्यानगर, महाराष्ट्र यांना तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये पहिल्या दोन श्रेणींमध्ये म्हणजेच सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/एफपीओ/एमपीसी मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक यांचा समावेश असेल:
Rs. 5,00,000/-(पाच लाख रुपये) – प्रथम क्रमांक
Rs. 3,00,000/- (तीन लाख रुपये) – द्वितीय क्रमांक
Rs. 2,00,000/- (दोन लाख रुपये) – तृतीय क्रमांक
Rs. 2,00,000/- (दोन लाख रुपये) – ईशान्य प्रदेश (एनईआर)/हिमालयीन राज्यांसाठी विशेष पुरस्कार

सर्वोत्तम कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार-2025 मध्ये केवळ गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असेल.

Details of Winners in each category are as under:

S. No.CategoryName of the winners of NGRA 2025 with rank
   1.Best Dairy farmer rearing indigenous cattle/buffalo breedsNon-NER:1st     Shri Aravind Yashavant Patil, Kolhapur, Maharashtra.
2nd    Dr. Kankanala Krishna Reddy, Hyderabad, Telangana.
3rd     Mr. Harshit Jhuria, Sikar, Rajasthan.
3rd Kumari Shraddha Satyawan Dhavan, Ahmednagar, Maharashtra.N
ER/Himalayan:Smt. Vijay Lata, Hamirpur, Himachal Pradesh.Shri Pradeep Pangariya, Champawat, Uttarakhand.
2.Best Dairy Cooperative society/ Milk Producer company/ Dairy Farmer producer organizationNon-NER:1st   Meenan Gadi Ksheerolpadaka Sahakarana Sangham Ltd, Wayanad, Kerala.
2nd Kunnamkattupathy Ksheerolpadaka Sahakarana Samgham, Palakkad, Kerala.
2nd Ghinoi Dugdh Utpadak Sahkari Samiti, Jaipur, Rajasthan.
3rd  TYSPL 37 Sendurai Milk Producers Cooperative Society Ltd, Ariyalur, Tamil Nadu.
NER/Himalayan:Kulha Duud Udpadhak Sahkari Samiti, Udham Singh Nagar, Uttarakhand.
3.  Best Artificial Insemination Technician (AIT)Non-NER:1st     Mr. Dillip Kumar Pradhan, Anugul, Odisha.
2nd     Mr. Vikas Kumar, Hanumangarh, Rajasthan.
3rd     Mrs. Anuradha Chakali, Nandyal, Andhra Pradesh.
NER/ Himalayan:Mr. Deluwar Hasan, Barpeta, Assam.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading