November 21, 2025
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा २०२५ चा काव्य पुरस्कार डॉ. योगिता राजकर यांच्या ‘बाईपण’ संग्रहाला जाहीर. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमधील संमेलनात होणार.
Home » सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना जाहीर
काय चाललयं अवतीभवती

सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना जाहीर

डिसेंबर मध्ये सम्यक संबोधी साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण

कणकवली – सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा 2025 सालचा काव्य पुरस्कार वाई येथील कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बाईपण’ या दीर्घ कवितेच्या संग्रहाला जाहीर झाला आहे. संस्थेच्या बैठकीत या पुरस्कारासाठी डॉ. राजकर यांच्या ‘बाईपण’ या काव्यसंग्रहाची निवड केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.

सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेची बैठक यावर्षी होणाऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे आयोजित करण्यात आली.संस्थेचे सचिव सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष संदीप हरी कदम, खजिनदार नेहा कदम, संतोष कदम, धम्मपाल बाविस्कर,सत्यवान साटम,रीना पाटील, शशिकांत तांबे आदी उपस्थित असणाऱ्या बैठकीत दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचा सदर पुरस्कार ‘बाईपण’ या काव्यसंग्रहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संस्थेच्या आगामी संमेलना संदर्भातही चर्चा करण्यात आली.

कवयित्री डॉ योगिता राजकार या नव्या पिढीतील एक प्रसिद्ध कवयित्री असून मुंबई सृजन प्रकाशनातर्फे त्यांचा ‘ बाईपण’ हा दीर्घ कवितेचा संग्रह प्रकाशित झाला आहे. बाईच्या शोषित जगण्याचा तळ खोदून काढताना बाईच्या अस्तित्वाचा धांडोळा घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न ‘ बाईपण’ या कवितेत करण्यात आला आहे. अतिशय सूक्ष्म पातळीवर बाईच्या दिनक्रमाची गाथा मांडता मांडता बाईच्या वेदनेचा पट उलगडत जाणारी ही कविता अपवादात्मक मराठीत लिहिल्या जाणाऱ्या कवयित्रींच्या दीर्घ कवितेत स्वतःच स्थान अधिक ठळक करत जाते. या सगळ्याचा विचार करून बाईपण या काव्यसंग्रहाची सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती किशोर कदम यांनी दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading