शरीर निकामी झालं की
लाकडावर लाकूड रचून
दूध दही शेवटची अंघोळ
नवीन साडी नवीन धोतर
मीठ कुंकू ,फुलांचे हार
नवरी नवरदेवाचा तो साज
शुभ्र कापडात झाकून
घट्ट दोरीने बांधून
खांद्यावर घेत मिरवताना
तो नटलेला देह
तुला मला पाहत नसतो
कोण किती टाहो फोडतो
शेवटी माणसाला
सरणावर जायचे असते
जळून राख होण्यासाठी
श्वास बंद पडला की कळतं
बाहेरचं तन कितीही सुगंधित
केलं तरी काही वेळा नंतर
दुर्गंधी देणार असतं…….
आत्मा निघून गेला की
तन मातीत पुरव लागत
नाहीतर मातीत उगवलेल्या
झाडाच्या लाकडांसोबत
जाळून खाक करावं लागत
आयुष्याच मोल हे
मातीत मुरलेले आहे
तुम्ही आम्ही फक्त
बांडगुळ आहोत मातीचे…
…स्वाती ठुबे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
