आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१- जोर ओसरणार –
गुरुवार ( दि. २९ मे ) ते मंगळवार ( दि.३ जून ) दरम्यानच्या पाच ते सहा दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात पूर्णतः नसला तरी पावसाचा जोर हळूहळू काहीसा ओसरू लागेल, असे वाटते. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर सोमवार ( दि. २ जून) पर्यंत कायम जाणवतो.
२- पावसाचा खण्ड नव्हे पण उघडीप मिळणार-
शुक्रवार दि. ३० मे ते १० जून ते मंगळवार दि. १० जून दरम्यानच्या १०-१२ दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात, मान्सूनच्या त्याच्या पुढील वाटचालीला बाधा न येता, ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला त्याठिकाणी, वाफस्यावर पेर-पूर्व मशागत, व खरीप पेरणीसाठी पावसाची काहीशी उघडीप मिळून, शेतकामासाठी सापड मिळू शकते, असे वाटते.
३-मान्सून ची सध्य:स्थिती-
दोन दिवसापूर्वी पुण्या-मुंबईत पोहोचलेला मान्सून, सध्या त्याच्या वाटचालीत वातावरण अनुकूल असल्यामुळे तो नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे.
पालघर, नाशिक, खान्देश, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्याकडे त्याने अजुन झेप घेतलेली नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.