👉🏻मागील वर्षीचे आपण हरभरा पीक बघितले तर, हरभरा पिकावर मर तसेच कॉलर रॉटचा प्रादुर्भाव झाला यामुळे खूप कमी उत्पादन मिळाले. या वर्षी सुध्दा मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे, त्यामुळे सोयाबीन वरती कॉलर रॉट किंवा मर रोग यांचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे, त्याचा परिणाम हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
✍🏻 डॉ अनंत उत्तमराव इंगळे
हरभरा पेरणी अन् बियाणे निवड
हरभरा पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते,
पेरणीची योग्य वेळ – १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत पेरणी करू शकता, त्यादृष्टीने बियाणे निवड असेल तसेच वाण निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे,
पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया व पेरणी पूर्वीचे नियोजन हे खूप महत्त्वाचे असते. हरभरा वाण निवड करता असताना दोन प्रकारचे असतात टपोरे दाणे म्हणजे काबुली व लहान दाणे म्हणजे देशी वाण. आपल्या कडे उपलब्ध असलेली जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी.
👉🏻 हरभरा वाण निवड करताना जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धता यानुसार वाण निवड करावी
१. भारी जमीन ( २ पाणी देणे शक्य असेल तर)
फुले विक्रांत, फुले दिग्विजय, फुले विक्रम, PKV कनक, पुसा मानव
हे वाण आपण घेऊ शकता
👉🏻
मध्यम जमीन
फुले विजय, जाकी-९२१८, फुले राजविजय, फुले विश्वराज, फुले विक्रम
@👉🏻 काबुली वाण
काबुली वाण लागवड करत असताना भारी जमीन असणे आवश्यक आहे तसेच अंतर थोडे जास्त ठेवावे ४५*१५ सेमी याप्रमाणे
विराट, फुले कृपा, पिकेव्ही- २, पिकेव्ही – ४, या वाणांची निवड करू शकता.
👉🏻हलकी व भुरकी ( बरड) जमीन असेल तर हरभरा पेरणी करणे टाळावे त्याठिकाणी दुसरे पीक घ्यावे. लागवड करताना
४५*१० सेमी किंवा ३० * १५ सेमी अशी पेरणी करावी.
विक्रम व कनक या वाणासाठी थोडे जास्त अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु ६० सेमी पेक्षा जास्त ठेवू नये. लागवड केल्यास ४५ *१० ते १५ सेमी अंतरावर लागवड करावी.
👉🏻बियाण्याचे प्रमाण :
@ काबुली वाण ( टपोरे दाणे ) – १०० किलो / हेक्टरी ( ३५-४० किलो एकरी )
@ हरभरा ( लहान दाणे ) – ६५-७५ किलो / हेक्टरी ( २५-३० किलो एकरी )
🌱✅विशेष नियोजन :
यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला, अजून परतीचा पाऊस जर जास्त झाला तर याचा हरभरा पिकावर नक्कीच परिणाम होणार आहे, तसेच सोयाबीन नंतर हरभरा पीक घेतले जाते बरेच ठिकाणी सोयाबीन वर कॉलर रॉट असेल किंवा चारकोल रॉट असेल यांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्याचा सुध्दा हरभरा पिकावर होऊ शकतो, मागील वर्षी झालेल्या जास्त पावसामुळे हरभरा पिकावर मर व कॉलर रॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पेरणी पूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून मागील वर्षी सारखे नुकसान होणार नाही.
👉🏻 पेरणपूर्वी बियाण्याची उगणक्षमता बघून व बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी .
👉🏻मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तरच यावर आपल्याला नियंत्रण करता येते
👉🏻 बीज प्रक्रियेसाठी
Carbendazim 25 %+ Mancozeb 50 % WS (Sprint) 3 ग्राम प्रती किलो किंवा Carbendazim २-३ ग्रॅम प्रति किलो किंवा Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS (xelora) २-३ ml प्रती किलो किंवा Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, (Ever gol extend ) ० .५ ते १ ml प्रती किलो बियाणे तसेच Thimethoxum ३० FS ५ -७ ml प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
👉🏻त्यानंतर पेरणी करण्याच्या १ तास अगोदर Rhizobium ( जैविक खत ) २०० -२५० ग्रॅम १० किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावली मध्ये वाळवून नंतर पेरणी करावी
👉🏻 पेरणी करत असताना किंवा नंतर Trichoderma viridi किंवा pseudomonous एकरी ४-५ लिटर किंवा किलो गांडूळ खतामद्ये मिसळून टाकावे किंवा sprinkler च्या पाण्यातून सोडावे मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक बुरशीनाशक म्हणून trichoderma viridi काम करते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते
👉🏻हरभरा पीकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी Trichoderma viridi चे ड्रेंचींग करावे ( पाण्यासोबत) किंवा १०-२० किलो ओली माती किंवा ५० किलो गांडूळ खत घेऊन त्यामधे ४ किलो किंवा ४ लिटर trichoderma viridi यांचे मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुरळणी करावी. ( हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे).
👉🏻हरभरा पिकला रासायनिक खत जास्त नाही दिले तरी चालते परंतु २५:५०:०० किंवा २०:४०:२० नत्र : स्फुरद : पालाश किलो प्रति हेक्टर प्रमाणे खत देणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आपण १२:३२:१६ ५०-६० किलो किंवा DAP किंवा १०:२६:२६ ५०-६५ किलो प्रती एकर दिले तरी चालेल . युरिया किंवा पोटॅश देण्याची गरज नाही. जर आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असेल तर सल्फर १० किलो किंवा झिंक ५ किलो यांचा वापर करू शकता. सल्फर व झिंक चा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडते.
👉🏻हरभरा पिकाला जास्त पाणी देऊ नये फक्त २ पाणी द्यावेत.
👉🏻 जास्त ओलावा असताना पेरणी करू नये शेत व्यवस्थित सुकले की, योग्य ओलावा असताना पेरणी करावी, खोल पेरणी करावी, तसेच पेरणी नंतर पहिली फवारणीच्या वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा,
👉🏻पाणी देण्यासाठी स्प्रिकलर चा वापर केल्यास फायदा होतो तसेच शेंडे खुडने सुध्दा महत्वाचे असते. कीड – रोग व्यवस्थापन करण्यासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात.
अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
