आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
या ठिकाणी व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट-
ठिकाण, किमान तापमान ( सरासरीच्या खाली).- जळगांव ८.१(-६.७), जेऊर ७(-७.५),
थंडीची लाट 👇
अहिल्यानगर- ८.५ (-५.२), नाशिक- ९.७(-४.९), मालेगाव ९.४(-५.७), पुणे ९.५(-५.५),
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती 👇
डहाणू १५.८(-५.९), मुंबई सांताक्रूझ १६.२(-५), सातारा ११(-५.१), छ.सं.नगर १०.५(-४.९), नांदेड १०.२(-६), परभणी ११.२(-५.४), अमरावती ११.५(-५.२), यवतमाळ १०.४(-६.६), गोंदिया १०.४(-५.४), वाशिम १०.६(-४.६).
पुढील तीन दिवस अजूनही थंडीचेच –
सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन कडाक्याची थंडी मात्र केवळ आजच जाणवू शकते. उद्या व परवा गुरुवार-शुक्रवारी (२०-२१ नोव्हेंबर ला) पहाटे ५ च्या किमान तापमानात वाढ होवून थंडी काहीशी कमी होईल. नंतर आठवडभर थंडी गायब होणार. शनिवार ते शनिवार दि. २२ ते २९ नोव्हेंबर च्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते.
आठवडभर कश्यामुळे एकाकी थंडी गायब होणार?
शनिवार दि. २२ नोव्हेंबरला बं. उप सागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होवून सोमवार दि. २४ नोव्हेंबर ला त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता असुन ते तीव्र कमी दाब क्षेत्र आंध्र प्रदेश, ओरिसा किनारपट्टी मार्गे पं. बंगाल कडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून उत्तर व ईशान्य दिशेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होवून महाराष्ट्रात थंडी गायब होण्याची शक्यता जाणवते.
किरकोळ पावसाची शक्यता…
सध्यातरी कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नाही. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता जाणवते. रविवार व सोमवार दि. २३ व २४ नोव्हेंबर अश्या २ दिवशी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अश्या ६ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदीच किरकोळ अश्या एक ते दिड सेमी, (१० ते १० मिमी.) इतक्या पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्रातील उर्वरित ३० जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता जाणवत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
