गुहागर – सन २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तरी इच्छुक लेखक-प्रकाशकांनी पुस्तके पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पसायदान पुरस्कार, उत्कृष्ठ कादंबरीस नागनाथ कोत्तापल्ले स्मृती पुरस्कार, तर कथासंग्रहास भारत सासणे पुरस्कार देण्यात येणार आहे. तीन हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तरी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती १० मार्च २०२६ पर्यंत पाठवाव्यात.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
डॉ. बाळासाहेब लबडे, मु. पो. शृंगारतळी, निळकंठ पार्क अ 103, ता. गुहागर, जि. रत्नागिरी. पिनकोड ४१५७२४
संपर्क – 9145473378
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
