October 25, 2025
तासगाव तालुक्यातील तुरुची येथे रंगीत गळ्याचा दुर्मिळ सरडा आढळला. मोरपंखी रंगाच्या पंख्यासारख्या पिशवीसाठी प्रसिद्ध हा जीव जैवविविधतेत आकर्षण ठरतो.
Home » तुरुची गावामध्ये आढळला दुर्मिळ फॅन थ्रोटेड लिझार्ड…
संशोधन आणि तंत्रज्ञान

तुरुची गावामध्ये आढळला दुर्मिळ फॅन थ्रोटेड लिझार्ड…

तुरची ( ता. तासगाव ) येथे वैशिष्ट्यपूर्ण असा दुर्मिळ फॅन थ्रोटेड लीजार्ड म्हणजेच रंगीत गळ्याचा सरडा आढळला. तुरची येथील भारती हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या धोंडोळी माळ परिसरातील महेश मदने यांच्या रानामध्ये या सरड्याचे दर्शन झाले. आकाराने पाली पेक्षाही लहान मातकट तपकिरी रंगाचा वैशिष्ट्यपूर्ण रंगीत गळा व त्यावरती असणारी रंगीबेरंगी मोरपंखी निळ्या काळ्या केसरी रंगाची पंख्यासारखी पिशवी लक्ष वेधून घेते.

गेली काही वर्षे सामडोली इथेही आढळून आला आहे. हा चाळके वाडी, सातारा, पन्हाळा-कोल्हापूर इथल्या परिसरात पठारावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आता तासगाव भागात सुद्धा दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळरानावर पण याचे अस्तित्व दिसून येते. दंडोबा परिसरात अजुन एक प्रजाती आढळते. ती पिवळा पांढऱ्या गळ्याची आहे.

अजितकुमार पाटील

शास्त्रीय नाव – Sitana superba
इंग्रजी नाव – Fan throated sitana
मराठी नाव – रंगीत गळ्याचा सरडा

भारतीय उपखंडात आढळणारा हा सरडा पश्चिम महाराष्ट्रात ही बऱ्याच वेळा दर्शन देऊन जातो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक ठेवणीमुळे आपले वेगळेपण सिद्ध करतो. विनीच्या हंगामामध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी तसेच संकटामध्ये बचावासाठी आपल्या गळ्याला असणारी पंख्याच्या आकाराची रंगीत पिशवी फुगवतो त्यामुळेच याला रंगीत गळ्याचा सरडा हे नाव पडले असावे. गवताळ माळरान डोंगर, टेकड्या दगड गोट्यांचा परिसर हा त्याचा आवडता रहिवास. मुंगी वाळवी सारखी कीटक, गवताच्या बिया हे त्याचे प्रमुख अन्न आहे. प्रत्येक पायाला चारच बोटे, पुढील पायापेक्षा मागील पाय लांब आणि मजबूत असल्याने मागच्या दोन पायावरती उभा राहून टेहळणी करताना आढळतो. असा हा जीवसृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण जीव आढळल्याने विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीचे सुंदर दर्शन घडत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading