January 21, 2026
वेव्स फिल्म बाज़ार 2025 मध्ये 22 फीचर व 5 डॉक्युमेंटरी प्रकल्पांसह जागतिक सहनिर्मिती, पिच सत्रे व भागीदारीसाठी जगभरातील चित्रपटनिर्माते गोव्यात 20–24 नोव्हेंबरला एकत्र येणार आहेत.
Home » वेव्स फिल्म बाज़ारच्या 19व्या आवृत्तीत जागतिक स्तरावरील सशक्त सहनिर्मिती बाजारपेठेची प्रस्तुती
मनोरंजन

वेव्स फिल्म बाज़ारच्या 19व्या आवृत्तीत जागतिक स्तरावरील सशक्त सहनिर्मिती बाजारपेठेची प्रस्तुती

पणजी – भारताची प्रमुख चित्रपट बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा 19वा वेव्स फिल्म बाज़ार (पूर्वीचा फिल्म बाज़ार) आता नव्या रूपात, सशक्त सहनिर्मिती बाजारासह परतत आहे. 56व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया)च्या निमित्ताने हा वेव्स फिल्म बाज़ार 20 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोवा येथील मॅरियट रिसोर्टमध्ये आयोजित केला जाणार आहे.

या 19व्या आवृत्तीत, वेव्स फिल्म बाज़ार 22 फीचर प्रकल्प सादर करणार असून त्यात भारत, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, रशिया, फिलिपीन्स आणि सिंगापूरमधील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रोजेक्ट्समध्ये हिंदी, उर्दू, बंगाली, मणिपुरी, तांगखुल, नेपाळी, मलयाळम, हरियाणवी, इंग्लिश, गुजराती, लडाखी, कोंकणी, कन्नड, मराठी, पंजाबी, काश्मीरी, रशियन, संस्कृत आणि ओडिया भाषांतील कथा आहेत.

निवडलेल्या चित्रपट निर्मात्यांना ओपन पिच सत्रात आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय निर्माते, वितरक, महोत्सव आयोजक, वित्तपुरवठादार,आणि विक्री प्रतिनिधी यांना आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. या पिचमधून भविष्यातील संभाव्य सहकार्यांसाठी समोरासमोर चर्चेचा मार्ग मोकळा होईल.
याशिवाय या वर्षीच्या सहनिर्मिती बाजारामध्ये 5 डॉक्युमेंटरी फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या डॉक्युमेंटरी कला, संगीत, पर्यावरण, शाश्वतता, शिक्षण, महिला चळवळ, लिंग आणि लैंगिकता, मानववंशशास्त्र यांसारख्या विविध विषयांना हाताळतात.

या वर्षीच्या यादीत उभरत्या चित्रपट निर्मात्यांसोबतच अनुभवी दिग्दर्शकांचाही समावेश असून त्यात किरण राव, विक्रमादित्य मोटवणे, शकुन बत्रा, देवाशिष माखीजा, इरा दुबे, सरिता पाटील, शौनक सेन आणि बाफ्टा पुरस्कार विजेते दिग्दर्शक बेन क्रिच्टन यांचा समावेश आहे. वेव्स फिल्म बाज़ारने “एशिया टीव्ही फोरम अँड मार्केट” (एटीएफ) सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत “ग्लोरिया” नावाचा प्रकल्प विशेष प्रोजेक्ट एक्सचेंज उपक्रमात समाविष्ट झाला आहे.

तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)च्या विशेष निवडलेल्या

शेम्ड, स्मॅश, टायगर इन द लायन डेन या 3 प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे:

सहनिर्मिती बाजार फीचर प्रकल्प
उलटा मॅडम | भारत, फ्रान्स, कॅनडा | हिंदी
दिग्दर्शक: परोमिता धर | निर्माता: हायश तन्मय

दोज हू फ्ल्यू | भारत | हिंदी, उर्दू, बंगाली
दिग्दर्शक: सौम्यक कांती दे बिस्वास | निर्माता: इरा दुबे

खेई-हिया : नाईट अँड डे | भारत | पाउला / मणिपुरी / नेपाळी / इंग्लिश
दिग्दर्शक: अशोक वेलिऊ | निर्माता: शौनक सुर, प्रतीक बागी आणि अलेक्झांडर लिओ पाउ

द मॅनेजर | भारत | मलयाळम
दिग्दर्शक: संदीप श्रीलेखा | निर्माता: अनुज त्यागी, विपिन राधाकृष्णन

व्हॉट रिमेन्स अनसेड | भारत | हरियाणवी, हिंदी, इंग्लिश
दिग्दर्शक: कल्लोल मुखर्जी | निर्माते: देवाशिष माखीजा, हर्ष ग्रोवर, आदित्य ग्रोवर

कांदा (नो ओनियन्स) | भारत | गुजराती, हिंदी
दिग्दर्शक: आरती निहार्श | निर्माते: शकुन बत्रा आणि डिम्पी अग्रवाल

कक्तेत ( इडियट) | भारत, फ्रान्स | लडाखी
दिग्दर्शक: स्टेनझिन तानकोंग | निर्माता: रितू सारिन

अ डेथ फोरटोल्ड | भारत | हिंदी
दिग्दर्शक: किसले | निर्माते: त्रिबेनी राय, हिमांशू कोहली, नेहा मलिक

टायर्स विल बी डीफ्लेटेड | भारत | हिंदी
दिग्दर्शक: रोहन रंगनाथन | निर्माते: शौनक सेन, अमन मान

मायापुरी (सिटी ऑफ इल्युशन्स) | भारत | हिंदी
दिग्दर्शक: अरन्या सहाय | निर्माता: मथीवनन राजेंद्रन

पुथेनकचरी ( सेक्रेटेरिएट)| भारत, कॅनडा | मलयाळम
दिग्दर्शक: राजेश के | निर्माता: जेम्स जोसेफ वलियाकुलथिल, वेद प्रकाश कटारिया

सजदा | भारत | हिंदी
दिग्दर्शक: मोहम्मद गनी | निर्माता: संजय गुलाटी

टीचर्स पेट | भारत, अमेरिका | इंग्लिश
दिग्दर्शक: सिंधू श्रीनिवास मूर्ती | निर्माते: ऐश्वर्या सोनार, शुची द्विवेदी, विक्रमादित्य मोटवणे

सेव्हन टू सेव्हन | भारत | गुजराती, हिंदी
दिग्दर्शक: नेमिल शाह | निर्माता: नेमिल शाह आणि राजेश शाह

कटकुआ (द क्विल) | भारत | बंगाली, हिंदी
दिग्दर्शक: संखाजित बिस्वास | निर्माता: स्वरालीपी लिपी

शॅडो हिल : ऑफ स्पिरिट्स अँड मेन | भारत | कोंकणी, इंग्लिश, हिंदी
दिग्दर्शक: बास्को भांडारकर | निर्माते: किरण राव आणि तानाजी दासगुप्ता

पुष्पवती (द फ्लावर्ड वन) | भारत | कन्नड
दिग्दर्शक: मनोज कुमार व्ही | निर्माता: नितीन कृष्णमूर्ती

स्वर्णपुछ्री | भारत | हिंदी, मराठी, काश्मीरी
दिग्दर्शक: ऋत्विक गोस्वामी | निर्माता: निधी सल्याण

एनएफडीसीने निवडलेले विशेष केंद्रित प्रकल्प :

शेम्ड | भारत | हिंदी, पंजाबी, इंग्लिश
दिग्दर्शक: डिक्शा ज्योती राउतरे | निर्माता: सरिता पाटील

स्मॅश | रशिया, भारत | रशियन, इंग्लिश, हिंदी
दिग्दर्शक: मॅक्सिम कुजनेत्सोव्ह | निर्माता: एकातेरिना गोलुबेव्हा-पोल्डी

टायगर इन द लायन डेन | भारत, ग्रेट ब्रिटन | इंग्लिश
दिग्दर्शक: आर. सारथ | निर्माता: जॉली लोनप्पन

एटीएफ भागीदारी प्रकल्प

ग्लोरिया | फिलीपीन्स, सिंगापूर | इंग्लिश
दिग्दर्शक: अलारिक टे | निर्माते: डेरेक जज, रेक्स लोपेझ, अलारिक टे

सहनिर्मिती बाजार डॉक्युमेंटरी प्रकल्प
कलर्स ऑफ द सी | भारत | मलयाळम
दिग्दर्शक: जेफिन थॉमस | निर्माता: संजू सुरेंद्रन

देवी | भारत | ओडिया
दिग्दर्शक व निर्माता: प्रणब कुमार ऐच

नुपी केथेल: वुमन मार्केट | भारत | मणिपुरी
दिग्दर्शक: हाओबाम पाबन कुमार | निर्माते: हाओबाम पाबन कुमार, अजित युमनम, राजेश पुथनपुरायिल

सिंहस्थ कुंभ: अ ड्रॉप ऑफ नेक्टर | भारत | हिंदी, संस्कृत
दिग्दर्शक व निर्माता: अमिताभ सिंह

द महाराजा अँड मी | भारत, युनायटेड किंगडम | इंग्लिश, हिंदी
दिग्दर्शक: बेन क्रिच्टन | निर्माते: कार्ल हिलब्रिक, सू ग्रॅहम

वेव्ह्स फिल्म बाजारची पार्श्वभूमी

वेव्ह्स फिल्म बाजार हा पूर्वी फिल्म बाजार या नावाने ओळखला जाणारा भारतातील अग्रणी फिल्म बाजार असून, तो दरवर्षी गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) सोबत आयोजित केला जातो.

सन 2007 पासून, या बाजाराचे मुख्य उद्दिष्ट दक्षिण आशियाई चित्रपट,गुणवत्ता, चित्रपट बनवणे, निर्मिती आणि वितरण नवीन संधी उपलब्ध करून देणे आहे. वेव्ह्स फिल्म बाजार हे केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावरच्या निर्माते, विक्रेते,चित्रपट विक्री प्रतिनिधी आणि चित्रपट महोत्सव सादरकर्ते यांच्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.

हा बाजार हिंदी अक्षय मजकूर तसेच जागतिक सिनेमा च्या विक्रीसाठीही एक प्रभावी माध्यम आहे, ज्यामुळे जागतिक चित्रपट माध्यमांमध्ये भारतीय उद्योगाला नवीन स्थान मिळत आहे.या 5 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये नवीन फिल्म प्रकल्प शोधणे,गुंतवणूकदार आणि चित्रपट निर्माते यांची जोडणी,सह-निर्मिती ची संधी निर्माण करणे,जागतिक सिनेमा आणि भारतीय बाजारामध्ये सहकार्य वाढवणे तसेच विभाग तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या गोष्टींवर भर दिला जातो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मराठी भाषागौरव दिन आणि राजभाषा दिवस यातील फरक 

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद !

राज्यांच्या अर्थव्यवस्थेतील बेपर्वा ” रेवडी वाटप” चिंताजनक !

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading