मुंबई : येथील वंदना प्रकाशन संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्यप्रकारांना ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान केला जातो. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, इच्छुक लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व साहित्य क्षेत्राशी संबंधितांनी या पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावीत, असे आवाहन डॉ. सुनील सावंत यांनी केले आहे.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, लेखकाचा/लेखिकेचा एक छायाचित्र व अतिअल्प परिचयासह येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाठवाव्यात. ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान सोहळा दिवाळीपूर्वी किंवा नंतर नोव्हेंबर २०२६ मध्ये मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक – ‘आशीर्वाद पुरस्कार’
६०४, चंद्रदर्शन, आर. के. वैद्य मार्ग,
प्लाझा सिनेमा समोर, दादर (पश्चिम),
मुंबई – ४०० ०२८
सुखात्मक संवाद : ९८१९१८२३२९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
