केळी पिक 🍌🍌
पिकांची फेरपालट
पिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही. यासाठी केळी पिकानंतर केळी पीक घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी.
डाळिंब पिक
मृग बहार (मे-जून पीक नियमन)
✨बागेची मशागत
👉🏽बाग विश्रांती अवस्थेत असेल आणि मे महिन्याच्या शेवटी बहार व्यवस्थापन करायचे असल्यास, आपल्या जमिनीच्या मागदुरानुसार झाडांना ताण येण्यासाठी पाणी देणे बंद करावे. भारी जमिनीमध्ये पाच-सहा आठवडे, तर हलक्या जमिनीमध्ये तीन-चार आठवड्यांत ताण येऊ शकतो.
👉🏽बाग ताणावर असताना लवकर मृग बहार घ्यायचे नियोजन असल्यास इथेफॉनचा वापरून पानगळ करून घ्यावी. पानांच्या पिवळसरपणानुसार इथेफॉनचे प्रमाण ठरवावे.
👉🏽योग्य ताणामुळे नैसर्गिक पानगळ झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन वापरू नये. त्याऐवजी इथेफॉन (३९ एसएल) ०.२ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे चौकी तयार झाल्यानंतर फवारणी केल्यास चांगली फुलधारणा होते.
👉🏽बागेतील झाडांची ४०-५० टक्के पाने पिवळी झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन (३९ एसएल) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा.
👉🏽बागेतील झाडांची पाने हिरवी किंवा २० टक्क्यांपर्यंत पिवळी झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन (३९ एसएल) दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी ०.५ मि.लि., तर दुसरी फवारणी पानांच्या पिवळेपणानुसार १-१.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे करावी.
👉🏽बहार कालावधीत इथेफॉन (३९ एसएल) २.५ मि.लि. प्रतिलिटरपेक्षा वापर जास्त नसावा.
👉🏽प्रत्येक इथेफॉन फवारणीसोबत १८-४६-०/ १२-६१-०/ ०-५२-३४ ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळावे.
👉🏽पानगळ झाल्यानंतर, मे महिन्याच्या शेवटी हलकी छाटणी करावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंडयाकडून १०-१५ सें.मी.पर्यंत छाटाव्यात. काटे, वाळलेल्या फांद्या छाटाव्यात.
👉🏽जमिनीवर पडलेला पालापाचोळा, काड्या गोळा करून नष्ट कराव्यात किंवा खतासोबत मातीमध्ये गाडाव्यात.
( सौजन्य – कृषक )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
