November 22, 2024
Best Tourism Village Competition
Home » उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

“उत्कृष्ट पर्यटन गाव” नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. नामांकणासाठी अर्ज करण्याची मुदत पाच मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पर्यटन गाव स्पर्धा आयोजित करण्याचे मुख्य उद्देश –

  • पर्यटन स्थळांच्या विकासातील अडथळा दूर करणे.
  • ग्रामीण पर्यटनाबाबत आकर्षण निर्माण करणे,
  • बहु-स्तरीय प्रशासन, सहयोग आणि समुदाय प्रतिबद्धता मजबूत करणे
  • पायाभूत सुविधा, जनसंपर्क, आर्थिक स्त्रोत गुंतवणूकीत वाढ करण्यास प्रोत्साहित करणे
  • आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे
  • संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी टिकाऊ पद्धतींना प्रोत्साहन मिळावे.
  • शाश्वत अन्न प्रणाली आणि पर्यटन यांच्यात संबंध प्रस्थापित करण्यासाठी
  • नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांचे संरक्षण वाढवे

या पार्श्वभूमीवर UNWTO (United Nation World Tourism Organization) a Best Tourism Village Competition नामांकनासाठी https://rural.tourism.gov.in or nidhi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या नामांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 05 मे 2023 पर्यंत आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्वे व अर्ज भरण्याच्या पध्दती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही स्पर्धा जिल्हा, राज्य व केंद्र अशा स्तरांवर होणार आहे. “उत्कृष्ट पर्यटन गाव” (Best Tourism Village Competition) नामांकनासाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी आवश्यक असून त्यानंतर विहीत नमुन्यातील अर्ज, नामांकनाविषयक बाबींचे परिपूर्ण फोटो, विस्तृत माहितीसह, pdf स्वरुपातील सर्व माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरावयाची आहे.

त्यामध्ये पर्यटन खेड्यांची थोडक्यात परिपूर्ण माहिती (write-up only in English with required documents) सोबतच्या माहितीपत्रकातील सूचनांचे परिपूर्ण वाचन करुन संबंधित खेड्यांमध्ये पर्यटन विकासाला असणारा वाव, पर्यटनविषयक मूलभूत सोयी सुविधा, जिल्ह्याच्या पर्यटन विकासातील योगदान, भविष्यातील पर्यटन विकास योजनांचा आराखडा इ. माहिती संकेतस्थळावर pdf स्वरुपात (2 एमबी मर्यादेत) भरताना आवश्यक ठिकाणी संकेतस्थळावर checkbox मध्ये योग्य ठिकाणी टिक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading