September 7, 2024
Call for Book Award of Vidarbha Research Board
Home » विदर्भ संशोधन मंडळाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन
काय चाललयं अवतीभवती

विदर्भ संशोधन मंडळाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

  • विदर्भ संशोधन मंडळाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन
  • वैचारिक व संशोधनपर ग्रंथासाठी पुरस्कार
  • संत साहित्यावरील ग्रंथासाठी पुरस्कार

नागपूर – विदर्भ संशोधन मंडळातर्फे डॉ. सुरेश डोळके स्मृती ग्रंथ पुरस्कार व प्रा. श्री.मा. कुलकर्णी ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले आहे.

१ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले ग्रंथ यासाठी मागविण्यात येत आहेत. डॉ. सुरेश डोळके यांनी संशोधनाच्या क्षेत्रात मौलिक योगदान दिले असून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. सुरेश डोळके स्मृती ग्रंथ पुरस्कार वैचारिक व संशोधनपर ग्रंथासाठी देण्यात येतो तर प्रा. श्री. मा. कुलकर्णी यांनी संत साहित्यातील दिलेल्या योगदानाबद्दल संत साहित्यावरील ग्रंथासाठी प्रा. श्री. मा. कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो.

या प्रकारात मोडणारे ग्रंथ ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी विदर्भ संशोधन मंडळ प्लॉट नंबर १, जवाहर वस्तीगृहाच्या बाजूला, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर दोन प्रती मध्ये पाठवावे असे मंडळाचे सचिव डॉ. वाटाणे यांनी केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर

आंबा आठवणीतला

फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading