तुम्हाला अति सुरक्षित ( High Security ) नंबरप्लेट तुमच्या वाहनास बसवायची आहे पण आपणास काहीच कल्पना नाही. अगदी सोपी पद्धत आहे. पण उगाचच याचा बाऊ केला जात आहे. सरकारने इतकी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे पण याचा वापर योग्य प्रकारे आपणच करत नाही.
यासाठीच मी राजेंद्र कृष्णराव घोरपडे स्वतःचा अनुभव आपणाशी सांगू इच्छित आहे. मी फक्त https://mhhsrp.com/ या वेबसाईटवर क्लिक केले. अन् माझी नंबर प्लेट बदलण्याची इच्छा व्यक्त केली. Book High Security Registration Plate यावर क्लिक करून बुकींग डिटेल्स भरले.
सर्व प्रथम राज्य हा रकाना भरला. आरसी बुकच्या मदतीने त्यावरील रजिस्टेशन नंबर, चेस नंबर, इंजिन नंबर, स्वतःचा मोबाईल नंबर भरले. व पुढच्या पानावर गेलो. तेथे बील आले. त्यामध्ये घरी येऊन बसविण्यासाठी स्वतंत्र १२५ रुपये असल्याचा रकाना निवडला अन् अवघे ६७८ रुपये ५० पैशाचे बील भरले. आठ तारखेला हा फार्म भरल्यानंतर तेथे लगेच नंबर प्लेट बसविण्यासाठीची तारीख व वेळ निवडण्याची होती. अवघ्या सात दिवसात नंबर प्लेट बदलून मिळते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अगदी घर बसल्या व्यक्ती येऊन तुमच्या वाहनाची नंबर प्लेट बदलून देतो. सरकारने दिलेल्या या सुविधेचा निश्चितच लाभ घ्या…
हा चेस नंबर व इंजिन नंबर भरताना प्रथम संपूर्ण नंबर भरल्यानंतही अडचणी येतात पण पुन्हा भरल्यानंतर त्या दुर होतात. फक्त पुन्हा भरताना त्यांनी त्यांनी सांगितलेले शेवटचे आकडेच भरावयाचे आहेत हे लक्षात घ्यावे. किंवा त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार तेवढेच आकडे भरायचे आहेत म्हणजे आपला फॉर्म व्यवस्थित भरला जातो हे लक्षात घ्यावे. ही सुचना तेथे बारीक अक्षरामध्ये दिलेली असते ते मात्र आपणाला निरखून पाहावे लागते.
मग घेताय ना या सुविधेचा लाभ… क्लिक करा … https://mhhsrp.com/
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.