राहुरी – आवळा प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राहुरी येथे हे प्रशिक्षण होणार आहे.
प्रशिक्षणासाठी १० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी केल्यास ४००० रुपये प्रशिक्षण शुल्क असून त्यानंतर येणाऱ्यांना ५००० रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. या प्रशिक्षणात आवळा कॅन्डी, आवळा गर साठवण, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व स्क्वॅश आणि आवळा पावडर कसे तयार करायचे या बद्दल शिकवले जाणार आहे. तसेच आवळा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरु करावा ?, अन्न व सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती आणि प्रक्रिया उद्योगाची नोंदणी कशी करावी?, आवळा पदार्थाचे पॅकेजींग आणि मार्केटींग कसे करावे ? आवळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल कशी करावी ? आवळा प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कोणत्या कर्ज योजना / अनुदान आहेत ? आवळा प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन कसे करावे ? आवळा प्रक्रिया उद्योगातील अडचणी कोणकोणत्या आहेत ? त्यावर उपाययोजना काय आहेत ? याचीही माहिती दिली जाणार आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी राहुल घुगे 9421437698 यांच्याशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
