June 25, 2025
wo animated child characters flying with small wings, smiling, symbolizing AI-crafted tale of friendship and courage
Home » एआयच्या मदतीने रेखाटलेली मैत्रीची हळवी गोष्ट लिटर विंग्ज ब्रेव्ह हार्ट्स
मनोरंजन

एआयच्या मदतीने रेखाटलेली मैत्रीची हळवी गोष्ट लिटर विंग्ज ब्रेव्ह हार्ट्स

आजच्या तंत्रज्ञान-युगात, जेव्हा Artificial Intelligence (AI) कल्पकतेला नवीन दिशा देत आहे, तेव्हा बंगळुरुस्थित अर्निमा स्टुडिओने एआयच्या मदतीने एक कोवळी, भावनिक गोष्ट जगासमोर आणली आहे — “Little Wings, Brave Hearts.” मनीषा रोडे, दीपा गोक्केकर आणि सोनाली देशपांडे या महिलांनी ही तयार केली आहे.

एका लहान पक्ष्याच्या पिलाचे आणि एका खारुताईचे मैत्रीचे नातं सांगणारी ही गोष्ट, मृदू रंगसंगतीत रेखाटलेली असून जणू एखाद्या चित्रकथेसारखी वाटते. पण या दृश्यांमागे मोठा अ‍ॅनिमेशन स्टुडिओ नाही.

“AI हा केवळ साधन आहे, पण कथा सांगण्याचा आत्मा मानवीच राहतो. आमचा उद्देश साधनं दाखवणं नव्हता, तर कल्पनाशक्तीला मुक्त पंख देणं होतं,”

सोनाली देशपांडे

गोष्टीची निर्मिती – कल्पनेपासून प्रतिमेपर्यंत

या लघुपटाच्या प्रत्येक फ्रेमसाठी AI चा वापर करून दृश्य तयार करण्यात आले. बारीकसारीक तपशीलांसाठी टेक्स्ट प्रॉम्प्ट्स वापरून, एकाच दृश्याचे अनेक पर्याय तयार करून, नंतर त्यातली योग्य भावनिक झलक निवडण्यात आली. या चित्रांची शैली मुद्दामच पुस्तकासारखी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून ती शाळकरी वाचकांनाही भावेल.

“सर्वात मोठं आव्हान हेच होतं — भावना टिकवणं. तांत्रिक गोष्टी AI करू शकतं, पण भावना पोहोचवण्यासाठी आम्हालाच मेहनत घ्यावी लागली,”

मनीषा रोडे

AI: संधीचा नवा मार्ग

अर्निमासाठी हा प्रकल्प म्हणजे केवळ तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग नव्हता, तर एक शक्यतेचा पुरावा होता. AI मुळे आमचा वेळ कथा आणि भावना यांच्यावर जास्त खर्च होतो, तांत्रिक अडचणींपेक्षा,”

दीपा गोक्केकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading