आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
पावसाची उघडीप –
संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक , नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार ११ सप्टेंबर पर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप परवा मंगळवार दि. ९ सप्टेंबरपासुन जाणवेल, असे वाटते.
पुन्हा पाऊस-
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ,खान्देश व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या २१ जिल्ह्यांत शुक्रवार १२ सप्टेंबरपासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.