कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.
भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन प्रस्तावित इमारतीसाठी एक लाख रुपयांच्या दातृत्वनिधीचा धनादेश डॉ. बी.डी. खणे यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे, डॉ. सचिन खणे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, डॉ. प्रल्हाद जाखले, अजित शेट्ये, विशाल शेट्ये उपस्थित होते.
भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन इमारत बांधकामास लवकरच सुरुवात होत असून या कार्यासाठी सर्व अहिंसाप्रेमी आणि जैनधर्मीयांनी सढळ हस्ते देणगी द्यावी, असे आवाहन डॉ. ककडे यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.