मुंबई – युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ (I.F.S.) उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, (SIAC) मुंबई येथे निःशुल्क ऑनलाईन अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे ८ एप्रिल २०२५ रोजी यशस्वीपणे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालक डॉ भावना पाटोळे यांनी दिली आहे.
या अभिरूप मुलाखतीत पॅनलचे सदस्य म्हणून डॉ. सुनिल लिमये, से. नि. (आय.एफ.एस. महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रिय सक्षम समितीचे सदस्य), पियुषा जगताप (उप वन संरक्षक, चंद्रपूर), धनंजय मगर ( उप वन संरक्षक, देवगड, ओडीशा), सुमेध सुरवडे (आय.एफ.एस. परिविक्षाधीन अधिकारी), श्री. प्रविण चव्हाण ( कोर्स संचालक, युनिक अॅकेडमी), श्री. गणेश शेट्टी, (विषय तज्ज्ञ) व प्रा.डॉ. भावना पाटोळे आदी उपस्थित होते. सदर मुलाखतीच्या पहिला टप्प्यात १० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच SIAC या संस्थेमार्फत वनसेवेकरिता ऑनलाईन मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले होते.
भारतीय वनसेवेकडे मराठी मुलांचा कल आता वाढलेला आहे. सन २०२४ साली भारतीय वनसेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थी हे अग्रक्रमाने असल्याचे दिसून येतात, सन २०२४ साली उत्तीर्ण झालेल्या १४७ विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर मराठी मुली आहेत. हा जो मराठी टक्का वाढतो आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. देशपातळीवर युपीएससी परिक्षेत मराठी टक्का वाढविण्याकरिता या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. पाटोळे यांनी सांगीतले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.