विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती…. शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
एस. के. शिंदे (सहशिक्षक)
बलवडी हायस्कूल बलवडी. मो. नंबर 9421227415
आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक दिन हा शिक्षकांनी ज्ञान आणि मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या योगदानाला आदराने स्वीकारण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा:
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. प्राचीन परंपरेनुसार शिक्षकाला आपण गुरु म्हणतो.आज तोच गुरु शिक्षक सर व मॅडम या नावाने ओळखला जातो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती…. शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षकी पेशा इतर पेशा पेक्षा फार वेगळा आहे. शिक्षकांचा संबंध हा निर्जीव वस्तू बरोबर नसून सजीव चेतनाक्षम मुलांबरोबर आहे. शिक्षक हा एक सजीव मूर्तीच घडवित असतो. मूर्ती घडविताना ज्याप्रमाणे शिल्पकाराला एखादा घाव जरी बसला तरी मोठा ढलता उडण्याची शक्यता असते .आणि त्यामुळे घडत आलेली मूर्ती नाश पावते .त्याचप्रमाणे शिक्षक हे आपले अध्ययन अध्यापनाचे काम अत्यंत काळजीपूर्वक वेगवेगळी कौशल्ये वापरून विद्यार्थी कलाने प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
आज विज्ञान व तंत्रज्ञान, संगणक, एआय, माहिती तंत्रज्ञानात फार मोठी प्रगती झाली आहे.
सर्व भाषांमध्ये प्रचंड साहित्य निर्मिती होत आहे. विविध खेळातील खेळाडू आपल्या खेळामध्ये नाविन्यपूर्णता आणत आहेत खेळामध्ये उच्चांक करत आहे. पहिले उच्चांक मोडत आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा प्रवेश व त्यांचे गगन भरारी कार्य, वैद्यकीय, अभियांत्रिक या सर्व क्षेत्रातील युवक एकदम तयार झाले नसून त्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी अथक पणे प्रयत्न करणारा अभ्यासू, प्रामाणिक शिक्षकच लपलेला असतो. आणि म्हणूनच त्यांना दैदीप्यमान यश प्राप्त होते. जर शिक्षकांशी साथ चांगली असेल तर विद्यार्थी ध्येयाप्रत लवकर व सुखरूप पोहोचतो नाहीतर त्याची अवस्था तुटलेल्या पतंगासारखी होते. वारा येईल तिकडे तो भरकट जातो व वारा थांबला की असेल तेथे जमिनीवर पडतो.
आजची मुले ही उद्याचे आधारस्तंभ आहेत या निष्पाप निरागस बालकाचे सुजान नागरिकात रूपांतरण होणे हे काही एक दोन दिवसाचे काम नाही. त्यासाठी त्याचा पद्धतशीर विकास साधला पाहिजे ,संस्कार हे बालवयाचाच रुसतात व वाढत्या वयाबरोबर दृढ होत जातात. असा संस्कारशील विद्यार्थीच आपल्या भावी जीवनाची वाटचाल सुखद करू शकतो. आणि तोच आपला खरा आदर्श आहे. आशा आदर्शाची संख्या देशात जितकी जास्त तितका देश विकसित होण्यास मदत होईल. यासाठी भावनिक व मानसिक सामर्थ्य असणारा सजीव शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर असला पाहिजे.
वर्गात कोणताही विषय शिकविताना विषय समजावा म्हणून मधून मधून शिक्षक प्रेरणा देतात. आत्मविश्वास वाढवतात. मुलांमध्ये निसर्गाने जे उपजत सुप्त गुण दिलेले असतात. त्या गुणांना योग्य दिशा देण्याचे काम खेळ, विविध उपक्रम, प्रयोग, सहली ,विविध गुणदर्शन कार्यक्रम, संगणक,स्नेहसंमेलन वेगवेगळ्या पालकसभांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व आत्मनिर्भर, तळमळीने करत आहेत.
कुसुमाग्रजांच्या कणा’या कवितेत पुरामध्ये सर्व घर उध्वस्त झालेला पूरग्रस्त विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडेच येतो .तो आर्थिक मदतीसाठी आलेला नसून (तुम्ही फक्त लढ म्हणा) एवढेच त्याची मागणी आहे .अशा तऱ्हेने शिक्षक केवळ शालेय जीवना पुरताच मर्यादित नाही. तर आयुष्यभर मुलांना शिक्षक आधार वाटत असतात. कारण त्याच्या हृदयात आईचे वात्सल्य, प्रेम तळमळ आणि मुलाच्या विकासाची ओढ अंतकरणांमध्ये असते.
आजच्या विज्ञान व संगणक युगामध्ये बटन दाबताच पृथ्वीवरील कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान क्षणात उपलब्ध होऊ शकते. परंतु संगणकाला वासल्य ,प्रेम ,करुणा भावनात्मक गुण नसल्यामुळे ते ज्ञान कसे वापरावे ,कशासाठी वापरावे हे शिक्षक सांगू शकतात .निर्जीव संगणक नाही. विनोबा भावे म्हणतात. विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा दोघेही ज्ञानपरायण असावेत व ज्ञान सेवा परायण असावे.
म्हणून मला म्हणावेसे वाटते आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांच्या पंखात बळ भरणारा शिक्षक हा देशाचा खऱ्या अर्थाने कणा आहे. किंबहुना जीवनशिल्पकार ठरतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.