त्या विद्यार्थ्याची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. ते प्राध्यापक खूपच त्या उत्तराबद्दल पश्चाताप आणि आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व प्रकार कॉलेजमध्ये पसरला तेव्हा त्या मुलाची खूपच नाचक्की झाली. पदवीची शेवटची परीक्षा संपेपर्यंत कोणताही विद्यार्थी हा प्रकार विसरू शकला नाही हेही तितकंच खरं !
निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
9423180393, 8668779597.
बीएस्सी (ॲग्री)च्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होती. वर्गातली मुलं शिक्षकांचं लक्ष चुकवून हळूच चुळबुळ करायचे. मुलं एकमेकाकडं बघून fill in the blanks (गाळलेल्या जागा भरा), match the pairs (जोड्या लावा), true or false (खरे की खोटे) हे सगळं मूकाभिनय अर्थातच खानाखुणा करून एकमेकांना विचारायची. वर्ग खूपच मोठा होता म्हणून शिक्षकांनाही कुजबूज केलेला आवाज लक्षात येत नव्हता. ……. is the organ of prehension of cow. गाईला चव कळणारा अवयव कोणता ? अशी ती इंग्रजीतून गाळलेली जागा होती. खरं उत्तर tongue म्हणजेच (जीभ) असं होतं मात्र सांगणारा आणि ऐकणारा यांच्यात अंतर जास्त होतं आणि आवाज न करता उत्तर सांगायचं होतं म्हणून ऐकणाऱ्याने सांगणाऱ्याच्या तोंडाच्या हालचालींवरून खानाखुणांचा अंदाज घेत tongue ऐवजी dung ऐकलं ! आणि पेपरात उत्तराच्या जागी लिहून पण टाकलं.
त्याला सांगणाऱ्याचा आवाज स्पष्ट आला नव्हता, पण Dung (शेण) हा गाईचा कोणताच अवयव नाही हे सुद्धा त्याला लक्षात आलं नव्हतं. पेपर तपासताना या उत्तरावरून शिक्षकांनी सुद्धा डोक्याला हात लावला. ते वर्गात पेपर घेऊन आले आणि त्यांनी हा प्रकार सर्वांसमोर सांगितला…! त्या विद्यार्थ्यांची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. त्या उत्तराबद्दल त्या प्राद्यापकांना खूपच पश्चाताप झाला आणि ते आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व प्रकार कॉलेजमध्ये पसरला तेव्हा त्या मुलाची खूपच नाचक्की झाली. पदवीची शेवटची परीक्षा संपेपर्यंत कोणताही विद्यार्थी हा प्रकार विसरू शकला नाही हेही तितकंच खरं !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
